ते स्वतःला ‘सीएम’ म्हणजे ‘कॉमन मॅन’ समजत, असंही श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Shrikant Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या भावी मुख्यमंत्रिपदावरून दावा सोडला आहे. काल पत्रकारपरिषद घेत त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतली, त्याला आपले समर्थन असेल असे जाहीर केले आहे. त्यानंतर भाजपकडूनही त्यांचे आभार व्यक्त केले गेले आहे. शिवाय, त्यांच्या या भूमिकेवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान त्यांच पुत्र शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी एक्सवर एक भावनिक पोस्ट केली आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.Shrikant Shinde
खासदार श्रीकांत शिंदे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला ‘सीएम’ म्हणजे ‘कॉमन मॅन’ समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला.’
‘कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि माननीय श्री. अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे.’
‘सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर – गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे. खूप अभिमान वाटतो बाबा!’ अशा शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App