Nanded Social Boycott : मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगावात दोन समाजांमध्ये तणावाचे वातावरण आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने काही बौद्ध तरुणांकडून जयघोष करण्यात आला. याचे निमित्त करून दुसऱ्या समाजातील तरुणांनी मारहाण व जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप दलित समाजाने केला आहे. या प्रकरणानंतर तीन ज्ञात आरोपींसह अनेक अज्ञातांविरोधात अॅट्रॉसिटी व भादंविनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु या पोलीस तक्रारीचा राग मनात धरून अख्ख्या गावानेच दलित समाजावर बहिष्कार टाकला. Shocking: Village in Nanded Social Boycott on Dalit community, cloesed groceries and medicines For Week
विशेष प्रतिनिधी
नांदेड : मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगावात दोन समाजांमध्ये तणावाचे वातावरण आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने काही बौद्ध तरुणांकडून जयघोष करण्यात आला. याचे निमित्त करून दुसऱ्या समाजातील तरुणांनी मारहाण व जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप दलित समाजाने केला आहे. या प्रकरणानंतर तीन ज्ञात आरोपींसह अनेक अज्ञातांविरोधात अॅट्रॉसिटी व भादंविनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु या पोलीस तक्रारीचा राग मनात धरून अख्ख्या गावानेच दलित समाजावर बहिष्कार टाकला.
या घटनेवर ‘दै. सकाळ’सह ‘द वायर’ या न्यूजपोर्टलने सविस्तर वृत्त दिले आहे. यानुसार भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी साजरी केली जाते. तथापि, महाराष्ट्रातील काही गावांमध्ये दरवर्षी एप्रिलच्या महिनाभर जयंतीचे कार्यक्रम होत असतात. रोही पिंपळगावातही 25 एप्रिल रोजी बौद्ध तरुणांनी एकत्र येत जयंतीनिमित्त बाबासाहेबांचा जयघोष केला. यावरून गावातील 30 हून अधिक तथाकथित सवर्णांनी दोन दिवसांनी एका दलित तरुणाला पकडून जयंतीचा कार्यक्रम का घेतला म्हणून विचारणा केली. यात दलित तरुणासह एक वयोवृद्ध दलित महिलाही सामील होती. यावेळी दोघांनाही जातीवाचक शिवीगाळ व तरुणाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. याविरुद्ध तरुणाने पोलिसांत रीतसर तक्रारही नोंदवली. यानंतर अख्ख्या गावानेच संतप्त होऊन गावातील 30 दलित कुटुंबांवर बहिष्कार टाकला. रोही पिंपळगावात 30 दलित कुटुंबे राहतात, तर 400च्या जवळ दुसऱ्या समाजाची कुटुंबे आहेत.
गावात दोन समाजांमध्ये तणाव झाल्यानंतर मेडिकल औषधे, जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान, पिठाची गिरणी दलित समाजासाठी बंद करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यासोबत दूध व्यवसाय करणाऱ्या दलित तरुणांकडून डेअरीत दूध खरेदीदेखील बंद केल्याचा प्रकार या गावात घडला. या घटनेची माहिती मिळाल्यावर काही सामाजिक संघटनांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला. परंतु त्याआधी जवळजवळ एक आठवडभर दलित समाजावर बहिष्कार टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आता परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे.
नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांच्या म्हणण्यानुसार, राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हा सामाजिक बहिष्कार घडला. हा प्रकार लक्षात येताच जिल्हा प्रशासनाने गावात पथक पाठवले. परिस्थिती चिघळणार नाही याची दक्षता घेण्यात आली. शेवाळेंच्या म्हणण्यानुसार, हा पूर्णपणे सामाजिक बहिष्कार नव्हता, कारण राज्यातील लॉकडाऊनमुळे गावातील बरीचशे दुकाने आधीपासूनच बंद होतील. परंतु यालाच चुकीने सामाजिक बहिष्कार मानण्यात आले. दरम्यान, रोही पिंपळगावातील या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून महाराष्ट्राला कलंकित करणारा प्रकार असल्याचा सूर आता उमटू लागला आहे.
Shocking: Village in Nanded Social Boycott on Dalit community, cloesed groceries and medicines For Week
महत्त्वाची बातमी
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App