विशेष प्रतिनिधी
पुणे : एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी इन्कमिंगचा धडाका लावला, तर दुसरीकडे त्यांचे उमेदवार परस्पर कापायचा ठाकरेंच्या शिवसेनेने सपाटा लावलाय!!
शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांना भाजपमधून आपल्या राष्ट्रवादीत घेऊन त्यांना तुतारी फुंकायला लावली. त्या पाठोपाठ रामराजे निंबाळकर, बबनदादा शिंदे हे देखील तुतारी फुंकण्याच्या बेतात आहेत. शरद पवारांनी पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये आपले जुने पाने नेते आणि समर्थक परत गोळा करायचा धडाका लावला आहे. यातून त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शह द्यायचा प्रयत्न चालविला आहे. पण पवारांच्या पक्षातल्या इन्कमिंगचा आकडा 15 ते 20 पेक्षा जास्त नाही. मात्र त्या बातम्यांचा रतीब घालणे मराठी माध्यमांनी सुरू ठेवले आहे.
Congress : काँग्रेसचे उत्तरेतले पुनरुज्जीवन प्रादेशिक पक्षांच्या मूळावर; महाराष्ट्रातही सत्ता खेचायचा “डाव” ठाकरे + पवारांच्या बळावर!!
पण एकीकडे पवारांच्या पक्षात असे इन्कमिंग सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीतला दुसरा घटक पक्ष शिवसेनेने पवारांच्या पक्षातल्या इच्छुक नेत्यांच्या उमेदवारास परस्पर कापायचा सपाटा लावल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. त्यांनी तशी जाहिरातबाजी देखील चालू केली आहे. पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी महाविकास आघाडीत हडपसरची जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्याचे परस्पर जाहीर करून तिथून माजी आमदार महादेव बाबर यांची उमेदवारी देखील जाहीर करून टाकली. त्यामुळे पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे यांची शिवसेना यांच्यात बेबनाव निर्माण झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App