एकनाथ शिंदे : शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार!!; संजय राऊतांच्या वक्तव्याचा मागे उद्धव ठाकरे की शरद पवार??

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात अवघे 14 ते 17 आमदार उरले असताना त्यांच्यापेक्षा संख्याबळ याने अधिक असलेल्या एकनाथ शिंदे गटाकडे उद्धव ठाकरे गटाने खरंच शरणागती पत्करली आहे?? की त्यांची त्यांना एकनाथ शिंदे गटातील आमदार खेचून आणण्यासाठी नवे जाळे टाकले आहे?? अशी शंका आता तयार होत आहे. Shivsena splits : who is behind Sanjay Raut statement?? Uddhav Thackeray or sharad Pawar??

शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांचे एक खळबळजनक वक्तव्य या शंकेसाठी कारणीभूत ठरले आहे. बंडखोर आमदारांची खरंच मागणी असेल तर शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत करून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण केली आहे. पण संजय राऊत यांच्या या वक्तव्याला मागे खरंच नेमके कोण उभे आहे?? दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे मकी शरद पवार??, अशी शंका तयार होत आहे.

– मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्याची पवारांचीच सूचना

कारण कालच्या फेसबुक लाईव्ह मध्ये उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊन टाकली होती. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर द्यावी, अशी सूचना खुद्द शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना फोनवर बोलताना केली होती. तशा बातम्या देखील आल्या होत्या. परंतु या बातम्यांचा उद्धव ठाकरे यांनी इन्कार केला नाही, तर संजय राऊत यांनी इन्कार केला होता. मात्र या बातमीत तथ्य होते. असेच शिवसेनेतल्या सूत्रांनी नंतर स्पष्ट केले होते. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर द्या अशी सूचना शरद पवारांनी केल्याचे स्पष्ट झाले.



मग आज ज्या पद्धतीने संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत अचानक शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, असे जे वक्तव्य केले त्या वक्तव्य मागे नेमके कोण उभे आहे?? उद्धव ठाकरे की शरद पवार??, अशी शंका यातून निर्माण झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी कालची मुख्यमंत्रीपदाची ऑफर अवघ्या अर्ध्या तासात फेटाळून लावली होती. शिवसेना महाविकास आघाडीत राहून घटक पक्ष मजबूत होत आहेत आणि शिवसेनेचे खच्चीकरण होत आहे. महाविकास आघाडीची अनैसर्गिक युती तोडा आणि भाजपशी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती करा, या मागण्या एकनाथ शिंदे गटाने केल्या आहेत.

– राऊत यांच्या वक्तव्याचा अर्थ काय??

त्यावर काल मुख्यमंत्री महोदय फेसबुक लाईव्ह मध्ये चकार शब्दाने बोलले नव्हते. मात्र आता आपण जबाबदारीने बोलत आहोत, असे सांगत संजय राऊत यांनी शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे असे म्हटले आहे. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा??, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. संजय राऊत यांचे वक्तव्य सिरियसली घ्यायचे का?? त्यांच्या वक्तव्य मागे उद्धव ठाकरे उभे आहेत की शरद पवार?? या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे.

– राऊत यांच्या वक्तव्य मागे पवारच!!

जर संजय राऊत यांच्या वक्तव्य मागे शरद पवार असतील तर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटाचे आमदार मुंबईत परत आणण्यासाठी आणि उद्धव ठाकरे गटात खेचण्यासाठी फेकलेले हे जाळेच आहे!!, असे मानण्यास वाव आहे. या जाळ्यात एकनाथ शिंदे फसतील का?? संजय राऊत यांचे वक्तव्य सिरियसली घेऊन ते मुंबईच्या दिशेने पाऊल टाकतील का?? एकनाथ शिंदे यांच्या गटातले कोणी आमदार संजय राऊत यांच्या वक्तव्यानुसार मुंबई येतील का??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Shivsena splits : who is behind Sanjay Raut statement?? Uddhav Thackeray or sharad Pawar??

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात