प्रतिनिधी
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांची परस्पर विसंगत वक्तव्य समोर आले आहेत एकीकडे संजय राऊत म्हणतात शिंद्यांची वेळ संपली आणि दुसरीकडे हेस राऊत कबुल करतायेत शिवसेनेचा आकडा कमी!! Shivsena splits : Sanjay Raut contradicts his own statements
एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या चौथ्या दिवशी संजय राऊत यांच्या विधान मधली विसंगती समोर आली आहे. शिंदेंकडे शिवसेनेच्या दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा आहे, हे त्यांच्या पत्राद्वारे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोण म्हणतं ४० आहेत कोण म्हणतं १४० आमदार आहेत. शिंदेगटातील आकडा वाढत असला तरी महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकसंघ आहेत. ठीक आहे, शिवसेनेचा आकडा कमी झाला आहे, असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. पण त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांची वेळ संपली आहे सरकार वाचवण्यासाठी स्वतःचे पवार मैदानात आले आहेत त्यामुळे महाविकास आघाडी सरकार वाचेल असेही वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.
लोकशाही बहुमताच्या आकड्यांवर चालते आकडा आणि बहुमत हे फार चंचल असते. आता ही सर्व कायदेशीर लढाई आहे.
संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत पुन्हा एकदा फुटलेल्या आमदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला आहे, ज्या दिवशी हे आमदार मुंबईत येतील , त्याच दिवशी त्यांच्या निष्ठेची, बाळासाहेबांवरील भक्तीची आणि शिवसेनेवरील श्रद्धेची खरी कसोटी लागेल. आम्हाला पूर्ण विश्वास आहे सभागृहात हा विषय येईल, तेव्हा महाविकास आघाडीच्या बाजूने आमदारांचा कौल असेल, असा दावा राऊत यांनी केला आहे.
धमक्या देण्याएवढा त्यांचा माज वाढला
नारायण राणे यांनी शरद पवारांवर केलेल्या ट्विटचाही राऊतांनी समाचार घेतला आहे. पवारांना धमक्या देण्यापर्यंत त्यांना माज वाढला आहे, असे राऊत म्हणाले. शरद पवार महाराष्ट्राचे सुपूत्र आहेत. आम्हाला धमक्या द्या. आम्ही बघून घेऊ. पण पवार साहेबांना धमक्या देण्याएवढा त्यांचा माज वाढला आहे. ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का, हे मोदी आणि शाहांनी स्पष्ट करावं. आम्हीही तसेच प्रत्युत्तर देऊ, असा इशारा राऊतांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App