प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या झालेल्या पराभवानंतर आता सरकारमध्ये बहुमत शिल्लक नसल्याचे स्पष्ट होत आहे. एकीकडे एकनाथ शिंदे हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असतानाच भाजप महाविकास आघाडीच्या पराभवावर बोचरी टीका करत आहे. Shivsena splits : BJP targets sharad Pawar and Uddhav Thackeray
विधान परिषद निवडणुकीत संख्याबळ कमी असून सुद्धा भाजपने आपले सर्व उमेदवार निवडून आणले. त्यामुळे यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. पहिलवान तेल लावून आले होते, पण खेळ बुद्धिबळाचा निघाला, असे ट्विट करत चित्रा वाघ यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
जय हो…..विजय हो @Dev_Fadnavis जी pic.twitter.com/eB4QY8f8AE — Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) June 21, 2022
जय हो…..विजय हो @Dev_Fadnavis जी pic.twitter.com/eB4QY8f8AE
— Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) June 21, 2022
– महाविकास आघाडीवर मात
विधान परिषदेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने पुन्हा एकदा चमत्कार घडवून आणला. भाजपने आपले पाचही आमदार निवडून आणत महाविकास आघाडीला पुन्हा एकदा धूळ चारली. या निवडणुकीत भाजपच्या आमदारांचे संख्याबळ कमी होते, त्यामुळे ही निवडणूक जिंकणे हे भाजपसाठी अशक्य मानले जात होते. पण पुन्हा एकदा भाजपने अंकांचे गणित जुळवून आणत महाविकास आघाडीवर मात केली.
– आखाड्याचा नाही, आकड्यांचा खेळ
राज्यसभेनंतर या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अपक्षांसह 113 आमदारांचे पाठबळ असलेल्या भाजपला या निवडणुकीत पहिल्या पसंतीची तब्बल 133 मते मिळाली. त्यामुळे हा आखाड्याचा नाही तर आकड्यांचा खेळ होता, असे भाजपने स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App