ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात; गजानन कीर्तीकरांचा मुलगा ठाकरे गटात; सुभाष देसाईंचा मुलगा शिंदे गटात!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेत आपापसात गट बदलणे ही आता नियमित राजकीय प्रक्रिया होऊ लागली आहे. तातातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात असं पुन्हा एकदा घडलं आहे. खासदार गजानन कीर्तिकर हे उद्धव ठाकरे यांना भेटून आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात काही दिवसांपूर्वी दाखल झाले. Shivsena political swapping; amok kirtikar choose Thackeray faction, bhushan desai choose shinde faction

मात्र, त्यांचा मुलगा अमोल किर्तीकर हा ठाकरे गटातच राहिला, तसेच आज महाराष्ट्राचे माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या मुलगा भूषण देसाई याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. अमोल कीर्तीकर आणि भूषण देसाई या दोघांनीही आपापल्या नगरसेवक पदाच्या राजकीय महत्त्वाकांक्षांनुसार निर्णय घेतला आहे.

 

गजानन कीर्तिकर हे शिवसेनेतले सगळ्यात ज्येष्ठ खासदार आहेत. पण उद्धव ठाकरेंनी आणि त्याआधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना कधीच केंद्रीय मंत्री पदाची संधी दिली नव्हती. ती मंत्रीपदाची संधी मनोहर जोशी आणि नंतर अरविंद सावंत यांना मिळाली. गजानन कीर्तिकर यांनी तरीदेखील शिवसेनेची कास सोडली नाही. ते शिवसेनेतूनच 2019 च्या निवडणुकीत पुन्हा खासदार झाले. मात्र जून 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार आपल्याबरोबर नेल्यानंतर काही महिने गजानन कीर्तिकर यांनी दोन्ही गटांची दिलजमाई करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना अपयश आले. शेवटी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आपला कौल देत त्यांच्या गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तिकर यांना आता शिवसेनेच्या संसदीय गटाचे नेते बनवले आहे. मात्र त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर याने ठाकरे गटातच राहणे पसंत केले आहे.

सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी मात्र ठाकरे गटाच्या ऐवजी शिंदे गट पसंत केला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत. या पार्श्वभूमीवर गजानन कीर्तिकर स्वतः सुभाष देसाई या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या सुपुत्रांनी स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षांची सोय होईल, अशा पद्धतीने निर्णय घेऊन अनुक्रमे ठाकरे आणि शिंदे गट पसंत करत त्यात प्रवेश केला आहे. आता त्यांचा प्रवेशाचा त्यांना किती राजकीय लाभ होतो??, हे आगामी निवडणुकांतच समजून येणार आहे.

 

Shivsena political swapping; amok kirtikar choose Thackeray faction, bhushan desai choose shinde faction

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात