विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनामुळे लोकसभेच्या सभागृहात खासदार बसत असलेल्या रांगेमधील टेबलवर फायबर काचा बसविण्यात आली होत्या. त्यामुळे सदस्याला आपले मत मांडताना अडचण येत होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यासाठी सभागृहातील टेबलवरील काचा काढाव्यात, अशी मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.Shivsena MP Barne demands removing fiber glasses from Parliament
याबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीत सदन व्यवस्थित चालविले. कोरोना नियमांचे पालन करत आपण अतिशय चांगल्यापद्धतीने सभागृह चालविले. कोरोनामुळे एकदा लोकसभा तर एकदा राज्यसभेचे कामकाज चालत होते. कोरोनामुळे लोकसभेतील बैठक व्यवस्थेत देखील बदल केले होते. सभागृहातील टेबलवर फायबर काचा बसविण्यात आल्या होत्या.
लोकसभेतल्या गोंधळाविषयी सभापती ओम बिर्ला यांची तीव्र नाराजी; गेल्या दोन वर्षांमधल्या उत्तम कामकाजाचा दाखविला “आरसा”; 122% कामकाज!!
सभागृहात बोलताना काचांमुळे अडचणी येत होत्या. सदस्याला आपले मत व्यस्थित मांडता येत नव्हते. आवाज जात नव्हता. आता कोरोना आटोक्यात आला आहे. प्रादुर्भाव कमी झाला. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या दुसरा सत्रातील अधिवेशन सुरु होण्यापूर्वी सभागृहातील टेबलवरील फायबर काचा काढण्यात याव्यात. जेणेकरुन खासदारांना आपले मती व्यवस्थित मांडता येतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App