Shivsena leaders : स्थानिक नेत्यांना नाही मोजत, पवारांची आता उरली नाही गरज; ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेस हायकमांडशी “डायरेक्ट कनेक्ट”!!

Shivsena leaders

विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना नाही मोजत, पवारांची आता उरली नाही गरज; ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेस हायकमांडशी “डायरेक्ट कनेक्ट”!!, ही बाब ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या एका वक्तव्यातून समोर आली. Now Shivsena leaders have direct connect with Congress high command

महाविकास आघाडीतल्या जागावाटपाबाबत संजय राऊत यांनी काँग्रेस संघटन सचिव के. सी. वेणूगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते डायरेक्ट राहुल गांधींशी बोलणार आहेत. ही माहिती स्वतः त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

वास्तविक संजय राऊत हे शिवसेनेचे नंबर 2 चे नेते नव्हेत. ते प्रदेश पातळीवरचे नेते आहेत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात प्राथमिक चर्चा करण्यासाठी शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंनी त्यांनाच नेमले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांशी संजय राऊत यांनी बोलणे अपेक्षित असते. तसे ते बोलले देखील. दुसऱ्या फळीतल्या नेत्यांच्या बैठकांमध्ये ते सामील देखील झाले. पण महाविकास आघाडीतले जागावाटप ज्या जागांवर अडले आहे, ते घोडे त्या जागांवरून सोडवण्यासाठी संजय राऊत के. सी. वेणूगोपाल, रमेश चेन्निथला या काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांची बोलले आणि आता ते थेट राहुल गांधींशी बोलणार आहेत.

यातून वर उल्लेख केलेलीच अधोरेखित होते, ती म्हणजे, संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे काँग्रेसच्या प्रादेशिक पातळीवरच्या नेत्यांना मोजायला तयार नाहीत. काँग्रेस हायकमांडशी संपर्क साधायला आता ठाकरे आणि राऊत यांना शरद पवार यांची गरज उरलेली नाही. ते थेट राहुल गांधी किंवा अगदी सोनिया गांधी यांच्याशी देखील बोलू शकतात. तसेही मध्यंतरी दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी पवारांना वगळून थेट काँग्रेस हायकमांडशी संपर्क साधलाच होता. काँग्रेस हायकमांडने देखील उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले असले, तरी त्यांची “आवभगत” मात्र चांगली केली होती. काँग्रेस हायकमांडने पण पवारांची “मध्यस्थी” त्यावेळी बाजूलाच सारून दिली होती.

त्यामुळे महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाचा तिढा मुंबईत बसून नव्हे, तर दिल्लीत बसूनच सोडवावा लागेल. कारण काँग्रेसचे “बॉस” तिथे बसले आहेत, हे “सत्य” आता ठाकरे आणि पवार या दोन प्रादेशिक नेत्यांनी स्वीकारले आहे.

Now shivsena leaders have direct connect with Congress high command

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात