नाशिक : शरद पवारांनी मध्यंतरी काढला देवाचा बाप, आज संजय राऊतांनी आज काढला हिंदुत्वाचा बाप, पण महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणतात, भाजपला सत्तेचा माज!! Shivsena 56 anniversary : CM Uddhav Thackeray targets BJP over agnipath arrogance
हो… हेच आज घडले आहे!! शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात भाषण करताना संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख “हिंदुत्वाचा बाप” असा केला. आज देशात आणि जगात हिंदुत्वाला जी काही किंमत आहे ती फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळेच आहे. बाळासाहेब ठाकरे हेच हिंदुत्वाचा बाप आहेत, हे सगळ्या जगाला माहिती आहे, अशी दर्पोक्ती संजय राऊत यांनी केली.
मध्यंतरी शरद पवारांनी एका कार्यक्रमात जवाहर राठोड यांची पाथरवट नावाची कविता सादर करून “साल्यांनो देवाचे बाप आम्ही आहोत”, असा उल्लेख केला होता. त्याचीच दुसऱ्या प्रकारची री संजय राऊत यांनी आज शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ओढलेली दिसली.
शिवसेनेचे नेते सर्वप्रथम हिंदुहृदयसम्राट हा उल्लेख स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत करायचे नंतरचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत, असे म्हणायचे. परंतु आजच्या पुढे जाऊन संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख थेट “हिंदुत्वाचे बाप” असा केला.
मात्र त्यानंतर भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला सत्तेचा माज आल्याचा आरोप केला. शरद पवार आणि संजय राऊत यांच्या सारखे महाविकास आघाडीतले दोन वरिष्ठ नेते अनुक्रमे देवाचा आणि हिंदुत्वाचा बाप काढतात आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री भाजपला सत्तेचा माज आहे, असे म्हणतात या राजकीय विसंगतीची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेनेचा वर्धापन दिन प्रथमच गेल्या 56 वर्षात एका हॉटेलात विशिष्ट राजकीय दबावापोटी साजरा करावा लागत आहे. शिवसेनेच्या आमदारांकडून विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाचे मॉकड्रिल करून घ्यावे लागत आहे. अन्यथा राज्यसभे सारख्या पराभवाचे तोंड पाहावे लागले याची प्रचंड भीती शिवसेनेसह काँग्रेसला आहे. पण हे सगळे सुरू असले तरी मुख्यमंत्र्यांच्या तोंडची भाषा मात्र भाजपला सत्तेचा माज आल्याची दिसली आहे.
मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात भाजपवर चौफेर हल्ला चढवताना अग्निपथ योजनेवरही शरसंधान साधले. भाड्याने घेण्यासाठी सैनिक तयार करू नका. आणि भाड्यानेच सैनिक तयार करायचे असतील तर भाड्याने सरकार पढ चालवा असा टोला त्यांनी केंद्रातल्या भाजपा सरकारला लगावला आहे. नोटबंदी, कृषी कायदे या मुद्द्यांवर देखील मुख्यमंत्र्यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे. पण मुख्यमंत्र्यांचे भाषण पवई मधल्या बंदिस्त हॉटेलमध्ये झाले ही वस्तुस्थिती बरेच राजकीय भाष्य करून गेली आहे
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App