ShivJayanti : तिथीनुसार शिवजयंती; मनसे काँग्रेस आमने-सामने; भाई जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!!

प्रतिनिधी

मुंबई : तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस पक्ष आमने-सामने आले आहेत.ShivJayanti: Shiva Jayanti according to date; MNS Congress face to face; Bhai Jagtap’s letter to CM

राज ठाकरे यांचे आदेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तिथीनुसार शिवजयंती सार्वजनिक स्वरूपात जोरदार साजरी करायची करायचा निश्चय केला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनाच्या पुण्यातल्या कार्यक्रमात मनसैनिकांना तिथीनुसार शिवजयंती जोरदार साजरी करण्याचे आदेश दिले आहेत.



 तिथीनुसार शिवजयंती साजरी करा पण घरात!!

या पार्श्‍वभूमीवर मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. तिथीनुसार शिवजयंती सार्वजनिक स्वरूपात नव्हे, तर घराघरात सण म्हणून साजरी करावी, अशा आशयाचे पत्र भाई जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. सार्वजनिक स्वरूप असलेल्या शिवजयंतीचा निर्णय महाराष्ट्राने एकमताने घेतला आहे

परंतु तिथीनुसार शिवजयंती घराघरात साजरी व्हावी आणि पुरोगामी महाराष्ट्राचा महाराष्ट्रात आपण सण साजरा करण्याचा नवा पायंडा पाडावा, असे आवाहन भाई जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. याची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या घरातून करावी आणि सर्व पक्षांच्या नेत्यांनी त्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन देखील भाई जगताप यांनी या पत्राद्वारे केले आहे.

अमित ठाकरे शिवनेरीवर जाणार

राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवनेरीवर जाणार आहेत. तसेच मनसे तर्फे शिवजयंतीच्या निमित्ताने मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी देखील करण्यात आली आहे. मात्र, तिथीनुसारची शिवजयंती सार्वजनिक स्वरूपात करण्यावरून मनसे आणि काँग्रेस आमने-सामने आल्याचे दिसत आहे.

ShivJayanti: Shiva Jayanti according to date; MNS Congress face to face; Bhai Jagtap’s letter to CM

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात