विशेष प्रतिनिधी
पुणे – पुणे – नाशिक महामार्गावरील नारायणगाव बायपासच्या उद्घाटन कार्यक्रमाची बातमी महाराष्ट्रभर गाजते आहे. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या कार्यक्रमात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांवर नेम धरत थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला. त्यावरून आढळराव पाटलांनी आज जोरदार प्रतिहल्ला चढविला. shivajirao adhalrao patil targets NCP MP dr. amol kolhe
आढळराव पाटील म्हणाले, की थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या अमोल कोल्हे यांनी स्वत:ची लायकी पाहून वक्तव्य करावे. हाच लबाड कोल्हा जेव्हा शिवसेनेतून मोठा झाला आणि आता शिवसेनेवरच बोलतोय. ज्या पक्षातून मोठा झाला त्यावर टीका करायचा त्याचा लबाडीचा गुणधर्म आहे काय? अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन तरुण आणि म्हातारे असा भेद करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कोल्हे करत आहेत. मी म्हातारा असलो, तरी माझ्याकडे बुद्धिमत्ता आहे. मला राजकीय समज आहे. त्यांच्यासारखा मी नुसता नटसम्राट नाही”, अशा शब्दांत आढळराव पाटलांनी खासदार कोल्हे यांना प्रत्युत्तर दिले.
डॉ. अमोल कोल्हेंचा नेम शिवाजीराव आढळरावांवर, बाण मुख्यमंत्र्यांवर; पुणे – नाशिक महामार्ग नारायणगाव बायपासच्या उद्घाटनात राजकीय शेरेबाजी
आढळराव पाटील म्हणाले, की नारायणगाव बायपास रस्त्याचे काम मी खासदार असताना सुरू झाले होते. त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मला डावलले. माझा, मुख्यमंत्र्यांचा एकही फोटो तिथे नव्हता. मला या कार्यक्रमात बोलवावे एवढीच माझी अपेक्षा होती. पण कोल्हे यांनी स्वतःची लायकी पाहून बोलावे. स्थानिक विषयांत शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांचा प्रश्न येतोच कुठे?, असा सवाल आढळराव पाटलांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App