प्रतिनिधी
मुंबई : बरीच भवति न भवति होऊन शिवसेनेने अखेर कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. पण छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा विश्वास व्यक्त केला. पण दरम्यान संभाजी राजें साठी आक्रमक असलेल्या मराठा संघटनांनी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर जोरदार आगपाखड केली. Shiv Sena’s candidature announced to Sanjay Pawar
संभाजीराजे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सविस्तर बैठकही झाली होती. पाठिंबा मिळण्यासाठी संभाजी राजेंनी छत्रपती घराण्याचा दाखलाही दिला होता. छत्रपती घराण्याचा मुख्यमंत्री सन्मान करतील,असा छत्रपतींना विश्वास व्यक्त केला. काही दिवसांपासून राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी सस्पेन्स होता. आता हा सस्पेन्स शिवसेनेने संपवला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोल्हापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केले आहे.
मात्र यानंतर मराठा संघटनांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार आगपाखड केली आहे. करण गायकर, विनोद पाटील, धनंजय जाधव यांनी शिवसेनेला याची राजकीय किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही दिला आहे
– पक्का मावळा संजय पवार
संजय पवार हे शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख आहेत. गेल्या 25 ते 30 वर्षापासून ते शिवसेनेत कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील कणखर नेतृत्व म्हणून संजय पवार यांच्याकडे पाहिले जाते. ग्रामीण भागातील उमेदवार पाठवण्याचे शिवसेनेने यावेळी ठरवले आहे. त्यादृष्टीकोनातून सर्वसामान्य शिवसैनिकाला संधी देण्याच शिवसेनेचा प्रयत्न आहे. संजय पवार गेली अनेक वर्षे कट्टर शिवसैनिक असणा-या संजय पवारांचे नाव राज्यसभेचा उमेदवार म्हणून आल्याने, शिवसेनेने धक्कातंत्राचे राजकारण केले आहे. संजय राऊत यांनी संजय पवार यांना “पक्का मावळा” असे संबोधत मावळे आहेत म्हणून राजे असतात, असे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App