प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना भवनातून काल दुपारपासून आज दुपारपर्यंत किरीट सोमय्या यांच्यावर धडाडणाऱ्या शिवसेनेच्या तोफा आज दुपारनंतर नारायण राणे यांच्या दिशेने वळल्या. कारण नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर तोफा डागल्या आहेत. त्या पाठोपाठ शिवसेनेच्या नेत्यांनी नारायण राणे यांना प्रत्युत्तर देताना “लाव रे तो व्हिडिओ” असे म्हणत फैरी झाडल्या आहेत.Shiv Sena turned the gun again towards Narayan Rane
शिवसेनेचे रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचे जुने व्हिडिओ वापरत त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. नारायण राणे यांच्या 100 बोगस कंपन्या असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केल्याचा तो व्हिडिओ आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे बोगस उमेदवार आहेत, असे नारायण राणे म्हणत असल्याचाही व्हिडिओ विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दाखवून घेतला आहे. आपल्यावरच्या ईडीच्या केसेस टाळण्यासाठीच नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये भाजप मध्ये उडी मारल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?@MeNarayanRane — Milind Narvekar (@NarvekarMilind_) February 16, 2022
बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?@MeNarayanRane
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) February 16, 2022
नारायण राणे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना “बॉय” म्हणून हिणवले होते. त्यांना मिलिंद नार्वेकर यांनी पत्रकार परिषदेतून नव्हे, तर ट्विट करून उत्तर दिले आहे. मेडिकल कॉलेजच्या परवान्यासाठी 7 – 7 वेळा फोन करून साहेबांची परवानगी मागत होतात. तुमच्या मेमरी ची घंटी वाजली का?, असे खोचक ट्विट मिलिंद नार्वेकर यांनी करून नारायण राणे यांना टोचले आहे.
खासदार विनायक राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांनी नारायण राणे यांच्यावर सोडलेला टीकास्त्रानंतर नारायण राणे किंवा आमदार नितेश राणे काय उत्तर देतात?, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App