प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेना कुणाची ठाकरेंची की शिंदेंची याचा संघर्ष शिगेला पोहोचून निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू झाल्यापासून चर्चेला उधाण आले आहे. एका बाजूला सुप्रीम कोर्टात केस आहे, तर दुसरीकडे निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष नक्की कुणाचा याचा निवाडा निवडणूक आयोग करणार आहे. निवडणूक आयोगासमोर १७ जानेवारीला रोजी पुढील सुनावणी होणार आहे. Shiv Sena Thackeray’s or Shinde’s; Hearing on January 17
एका बाजूला सुप्रीम कोर्टात १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात तर निवडणूक आयोगात धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार, यावर सुनावणी सुरू आहे. आयोगात युक्तीवाद सुरू आहे, तिथे कागदपत्रही जमा झाली आहेत. आता केवळ ठाकरे गटाचा युक्तीवाद बाकी आहे. त्यानंतर फैसला होणे अपेक्षित आहे. मंगळवारी, १७ जानेवारीला धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार आणि शिवसेना कोणाची याचा निर्णय सुनावला जाण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंसमोर फेरनिवडीचा नवा पेच
या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे एक नवा पेच उभा राहिला आहे. त्यांची शिवसेना पक्षप्रमुख पदाची मुदत 23 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या 282 प्रतिनिधींमार्फत आपली फेरनिवड करून घेण्याचा पेच उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. कारण ठाकरे गटाकडे 282 पैकी फक्त 107 प्रतिनिधी असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवसेनेच्या घटनेत बेकायदेशीर बदल करण्यात आल्याचा दावा शिंदे गटाने मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगात केला. त्यानंतर शिवसेनेची पक्षघटना केंद्रस्थानी आली आहे. त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेनेच्या घटनेनुसार प्रतिनिधी सभेतील 282 सदस्य शिवसेनेचा प्रमुख नेता निवडतात. आज शिवसेनेचा प्रमुख नेता निवडणारे 107 सदस्य उद्धव ठाकरे यांच्या गटात, तर तब्बल 175 प्रतिनिधी सदस्य एकनाथ शिंदे यांच्या गटात असल्याची माहिती आहे. हिंदुस्थान पोस्टने ही आकडेवारीची बातमी दिली आहे.
Shivsena – NCP : नोटा नोटा नोटा ग; नुसत्या बाष्कळ कोट्या ग…!!
शिवसेनेच्या पक्षघटनेनुसार, आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, मुंबईतील विभाग प्रमुख आदी प्रतिनिधी सभेचे सदस्य असतात. शिवसेनेचा प्रमुख नेता निवडण्याचा अधिकार त्यांना आहे. शिवाय हा प्रमुख नेता ज्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सहयोगाने काम करतो, त्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील 14 सदस्यांची निवडही प्रतिनिधी सभा करते. त्या सर्वांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो.
2018 मधील नोंदीनुसार या प्रतिनिधी सभेत 282 सदस्य होते. या सर्व सदस्यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षप्रमुख पदी निवडून दिले. येत्या 23 जानेवारीला ठाकरेंची मुदत संपते आहे. अशावेळी पुन्हा पक्षांतर्गत निवडणूक घेऊन प्रमुख नेता निवडावा लागेल.
उद्धव ठाकरेंची फेरनिवड कशी होणार?
23 जानेवारीनंतर उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. अशावेळी निवडणूक घ्यावी लागल्यास पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांच्यासमोर पेच आहे. कारण, शिवसेनेचा प्रमुख नेता निवडणाऱ्या प्रतिनिधी सभेतील 282 सदस्यांपैकी केवळ 107 सदस्य ठाकरेंकडे, तर 175 प्रतिनिधी सदस्य एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.
कायदेशीर कसोटीवर फेरनिवड टिकेल?
याचा दुसरा अर्थ असा की निवडणूक आयोगात खरी शिवसेना कोण कोणाची याची सुनावणी सुरू आहे दोन्ही गटांनी आपापली कागदपत्रे निवडणूक आयोगाला सादर केली. ती निवडणूक आयोगाने पाहिली आणि त्यातील काही कागदपत्रे दोन्ही गटांना परत केली. आता दोन्ही गटांनी आपापल्या प्रतिनिधींची संख्या निवडणूक आयोगाकडे कोणत्या स्वरूपात सादर केली आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचा परिणाम सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर देखील होण्याची चिन्हे आहेत.
सुप्रीम कोर्टात 14 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. 23 जानेवारी 2023 रोजी उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख पदाची मुदत संपल्यानंतर त्यांच्या गटात असणाऱ्या प्रतिनिधींनी त्यांची पक्षप्रमुख पदी फेरनिवड केली तर त्या प्रतिनिधींची नेमकी संख्या नमूद करावी लागेल. ही संख्या ठाकरे गट कशा पद्धतीने नमूद करतो आणि कायदेशीर कसोटीवर ती संख्या किती टिकते, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App