प्रतिनिधी
मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भाजपने तीन उमेदवार उतरवण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे. सगळे आमदार सद्सद्विवेकबुद्धीने आम्हाला मतदान करतील, असा आमचा विश्वास आहे. आम्हाला महाविकास आघाडीसारखा घोडेबाजार करण्याची जरूरत नाही. घोडेबाजाराची भीती वाटत असेल तर शिवसेनेने दुसरा उमेदवार मागे घ्यावा, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. Shiv Sena should withdraw the second candidate; Fadnavis’s reply to Raut
धनंजय महाडिक यांच्या रुपाने भाजपने राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार उतरल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपवर घोडेबाजार चालवल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेकडे आपले दुसरे उमेदवार संजय पवार यांना निवडून आणण्यासाठी आवश्यक मते असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. याच वेळी भाजपला तिसरा उमेदवार उतरवायचा होता. पण त्यापूर्वी त्यांनी संभाजीराजे यांचे राजकीय ढाल केली, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला.
LIVE | Media interaction at Vidhan Bhavan, Mumbai#RaajyaSabha https://t.co/A9uBEz6tjq — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 30, 2022
LIVE | Media interaction at Vidhan Bhavan, Mumbai#RaajyaSabha https://t.co/A9uBEz6tjq
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 30, 2022
संजय राऊत यांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपकडे तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मते आहेत. धनंजय महाडिक यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे. सदसद्विवेकबुद्धीला स्मरुन आमदार आम्हाला मतदान करतील. आम्हाला घोडेबाजार करण्याची जरुरत नाही. शिवसेनेला घोडेबाजाराची भीती वाटत असेल तर त्यांनी त्यांचा दुसरा उमेदवार मागे घ्यावा, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App