महाविकास आघाडीत वंचितला शिवसेनेने आपल्या कोट्यातल्या जागा द्याव्यात; अजितदादांनी सुनावले


प्रतिनिधी

मुंबई : प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये गळ टाकून ठेवला असताना ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ठाम विरोध करत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते अजितदादा पवारांनी शिवसेनेलाच सुनावले आहे. वंचितला महाविकास आघाडीत घ्यायचे असेल तर शिवसेनेने आपल्या कोट्यातल्या जागा त्यांना द्याव्यात आणि वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामावून घ्यावे, अशी सूचना अजितदादांनी केली आहे.Shiv Sena should give its quota seats to the underprivileged in Mahavikas Aghadi; Ajitdada narrated

प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरेंशी युती करण्याबाबत आग्रही आहेत. पण काँग्रेस – राष्ट्रवादीला त्यांच्या ठाम विरोध आहे. या पार्श्वभूमीवर अजितदादांची सूचना शिवसेनेसाठीच अडचणीची ठरलेली दिसत आहे. कारण महाविकास आघाडीतल्या तीन घटक पक्षांमध्ये जागा वाटपात प्रत्येक घटक पक्षाच्या वाट्याला विधानसभेच्या 100 पेक्षा कमी जागा येत असताना त्यातही शिवसेनेच्या वाट्या मधून वंचित बहुजन आघाडीला जागा देणे म्हणजे शिवसेनेची मूळचीच ताकद कमी करण्यासारखे आहे. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोध लक्षात घेता हे दोन्ही पक्ष आपल्या वाट्याची एकही जागा वंचितला देणार नाहीत, हे देखील स्पष्ट आहे. त्यामुळे केवळ प्रकाश आंबेडकरांच्या बाजूनेच नव्हे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाजूने देखील वंचित बहुजन आघाडीचा बॉल उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात गेला आहे.प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घेण्यासाठी चर्चा करत होते. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा वंचितला विरोध आहे. बरेच दिवस निर्णय घेतला नाही, त्यामुळे अखेर प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि वंचितला युतीमध्ये समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी केली. प्रकाश आंबेडकर यांनी अचानक दिशा बदलून त्यांनी उद्धव ठाकरे यांनी थेट आमच्याविषयी लवकर निर्णय घ्या, असे म्हटले. आता अजितदादांनी वंचितला सामावून घेण्यात येईल, असे म्हटले; पण त्यांनी अफलातून फॉर्म्युला सांगितला आहे, तो जर शिवसेनेला मान्य झाला तरच वंचित महाविकास आघाडीची संचित बनू शकणार आहे.

काय म्हणाले अजित पवार? 

या विषयावर राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फॉर्म्युला सुचवला आहे. शिवसेना आपल्या कोट्यातून वंचितला सामावून घेऊ शकते, असा पर्याय सुचवला आहे. आता त्यांना वरिष्ठांनी काही सांगितले असेल तर त्याबद्दल मला काही माहिती नाही. आमची महाविकास आघाडी असली तर काही लोक आमच्यासोबत येण्यासाठी चर्चा करण्यासाठी येतात. काही लोक हे त्या त्या पक्षाच्या कोट्यातून निर्णय घेतात. काँग्रेसला जर निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी त्यांच्या कोटातून निर्णय घ्यावा. शिवसेनेला जो कोटा दिला आहे, त्यांच्या कोट्यातून त्यांनी मित्र पक्षाला सामावून घ्यावे. राष्ट्रवादीने आपल्या मित्रपक्षाला आपल्या कोट्यात सामावून घ्यावे, असे केले तर अडचणी येणार नाहीत, असेही अजितदादा म्हणाले. पण यावर अद्याप शिवसेनेची भूमिका स्पष्ट झालेली नाही.

Shiv Sena should give its quota seats to the underprivileged in Mahavikas Aghadi Ajitdada narrated

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात