शिवसेना पदाधिकारी सुनेच्या तोंडावर थुंकला, भाजप आमदारसोबत सुनेची पोलीसांत धाव

मुलीसमान असलेल्या सुनेला मारहाण करीत तोंडावर थुंकण्याचा प्रकार कल्याण ग्रामीणचे माजी शिवसेना तालुका प्रमुख आणि विद्यमान विधानसभा संघटक यांनी केला. या घटनेचा मोबाईल क्लीपचा पुरावाच सुनेने सादर करीत भाजप आमदारांच्यासोबत पोलिस उपायुक्तांकडे धाव घेतली आहे.Shiv Sena office bearer spat on daughter in laws face, she ran to police with BJP MLA


विशेष प्रतिनिधी

कल्याण : मुलीसमान असलेल्या सुनेला मारहाण करीत तोंडावर थुंकण्याचा प्रकार कल्याण ग्रामीणचे माजी शिवसेना तालुका प्रमुख आणि विद्यमान विधानसभा संघटक यांनी केला. या घटनेचा मोबाईल क्लीपचा पुरावाच सुनेने सादर करीत भाजप आमदारांच्यासोबत पोलिस उपायुक्तांकडे धाव घेतली आहे.

कल्याण ग्रामीण परिसरातील भोपर गावात राहणाºया हर्षदा पाटील या शिवसेना पदाधिकारी एकनाथ पाटील यांच्या सूनबाई आहेत. सासरे एकनाथ हे सूनेला वारंवार त्रस देतात. त्यांना मारहाण करता. शिवीगाळ करतात.



इतकेच नाही तर हर्षदा यांच्या मुलीच्या अंगावरही धावून जातात. एकनाथ यांनी हर्षदा यांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रकार केला आहे. हर्षदा यांनी या घटनेचा मोबाईल व्हीडीओ पुरव्यासाठी तयार केला होता.

सास:याकडून कशा प्रकारे त्यांना त्रस आहे यासाठी हा व्हीडीओ त्यांनी तयार केला. सास:याकडून सुरु असलेल्या त्रासाची माहिती त्यांनी शिवसेनेच्या नेते मंडळींनी सांगण्याचा प्रकार केला. त्यांच्याकडून एकनाथ यांच्या विरोधात कोणतीही तक्रार ऐकून घेतली जात नाही.

पोलिसही हर्षदा यांच्या तक्रारीला दाद देत नाही. अखेरीस हर्षदा यांनी डोंबिवलीचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे दाद मागितली. आमदार चव्हाण यांनी या प्रकरणी भाजप नगरसेविका रविना माळी यांच्यासह हर्षदा यांना सोबत घेऊन पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याकडे हा प्रकार सांगितला.

पोलिस उपायुक्तांनी या व्हीडीओची सत्यता पडताळून चौकशी केली जाईल. चौकशी अंती कारवाई करण्यात येईल असे सांगितले.एकनाथ पाटील म्हणाले, सून ज्या व्हीडीओबाबत सांगत आहे.

तो व्हीडीओ दोन वषार्पूवीर्चा आहे. आत्ता आमच्यात कोणताही वाद नाही. सूनेला हाताशी धरून भाजपकडून माझी बदनामी सुरु आहे.

Shiv Sena office bearer spat on daughter in laws face, she ran to police with BJP MLA

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात