सरकार चालवताना “एकी”; निवडणूका लढवताना “बेकी”; महाविकास आघाडीत राष्ट्रवादी एकाकी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार चालवताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात वरवर एकवाक्यता दिसत असली तरी प्रत्यक्षात या तीनही पक्षांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला किंबहुना परस्परविरोधी असल्याचे स्पष्ट होत आहे. Shiv sena, NCP and Congress to contest all municipal poll Independently, says nawab malik

राज्यातल्या 14 महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याच निवडणुका शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्र लढवण्याच्या मन:स्थितीत दिसत नाहीत, अशी स्पष्ट कबुली राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

 


 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या स्वबळावर लढण्याच्या भूमिकेचे स्पष्ट शब्दांमध्ये समर्थन केले आहे. निवडणुका स्वतंत्र लढविण्यावर काँग्रेस पक्ष ठाम आहे. खुद्द राहुल गांधी यांची त्याला अनुकूलता आहे, असे त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. काँग्रेसने अशी वेगळी चूल मांडल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची चिन्हे निर्माण झाली होती. शरद पवार आणि तसे सूतोवाचही केले होते.

परंतु शिवसेनेने देखील नव्या परिस्थितीत आपली स्वतंत्र चूल कायम ठेवत 14 महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्था यातल्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचे व्यूहरचना केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आता एकटेच लढ्यापासून पर्याय नाही हे स्पष्ट झाले आहे. यातूनच नबाब मलिक यांचे तीनही पक्ष स्वतंत्र लढा लढण्याच्या मन:स्थितीत आहेत, हे वक्तव्य आले आहे.

महाविकास आघाडी सरकार चालवताना वरवर ऐक्य दाखवायचे आणि प्रत्यक्षात एकमेकांच्या विरोधात निवडणुकीमध्ये उभे राहून तोफा डागायच्या असेच तीनही पक्षांचे यातून धोरण दिसते आहे. त्यातही वैशिष्ट्य म्हणजे तीनही पक्षांचे राजकीय टार्गेट महाराष्ट्रात प्रबळ असलेला भाजपच आहे. एकट्या भाजपने सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये शंभरचा आमदारांचा आकडा पार केल्याने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पोटात गोळा आला आहे. अखंड काँग्रेस वगळता हे तीनही पक्ष विधानसभेच्या निवडणुकीत कधीही शंभरी पार करू शकलेले नाहीत. त्यामुळे एकत्र निवडणुका लढविण्याचे सूतोवाच राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी केले होते. त्याला पहिल्यांदी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी “खो” घातला. नंतर शिवसेनेनेही स्वतंत्र निवडणुक लढवण्याची व्यूहरचना केली त्यामुळे राष्ट्रवादी एक प्रकारे आघाडीत एकाकी पडली आहे. त्यातूनच नबाब मलिक यांचे स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचे वक्तव्य आले आहे.

Shiv sena, NCP and Congress to contest all municipal poll Independently, says nawab malik

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात