प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात सध्या शिवसेनेत खासदार – आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधींची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी स्थानिक पातळीवर आणि राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणावर खदखद आहे. पण त्याबद्दल चकार शब्द न काढता शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत मात्र कर्नाटक भाजपशी टक्कर घेण्यात मग्न आहेत. कर्नाटकात महाराष्ट्र एकीकरण समितीवर कथित बंदी घालण्याप्रकरणी संजय राऊत यांनी महाराष्ट्र कर्नाटक भाजपवर आवाज टाकला असून हिंमत असेल तर त्यांनी बंदी घालूनच दाखवावी, असे आव्हान दिले आहे. Shiv sena MLAs and MPs unrest in Maharashtra, but sanjay raut targets Karnataka BJP
शिवसेनेमध्ये महाराष्ट्र पातळीवर विविध कारणांमुळे प्रचंड खदखद आहे. शिवसेनेतले नेते एकमेकांशी भांडत तर आहेतच, पण शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक आणि राज्य पातळीवरील नेत्यांची देखील शिवसेना आमदार – खासदार यांचे जोरदार वाद आहेत. नांदेड, परभणी, कोकणातील रत्नागिरी, मुंबई येथे स्थानिक पातळीवर शिवसेना खासदार – आमदारांचे स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांची जोरदार खटके उडत आहेत.
शिवसेनेचा १० ते १२ आमदारांची थेट उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या विरोधात तक्रार केली आहे. अजित पवार हे शिवसेना आमदारांना निधी वाटपात दुजाभाव करतात, अशा तक्रारी शिवसेनेचे १०-१२ आमदार थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे घेऊन गेले आहेत. निधी वाटपाच्या बातम्या आल्या तेव्हा त्याचा सविस्तर खुलासा देखील झाला आहे. शिवसेनेच्या आमदारांपेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांना चौपट निधी देण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षातील आकडेवारी आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदार – खासदार आणि लोकप्रतिनिधींमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात आणि लोकप्रतिनिधीं विरोधात मोठ्या प्रमाणावर खदखद उसळून येत असताना खासदार संजय राऊत मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कथित विधानावरून पत्रकारांशी बोलत आहेत.
कर्नाटकात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक झाली आहे. ती खोट्या आरोपांखाली अटक आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी एकीकरण समिती वर बंदी घालण्याची भाषा केली आहे. पण हिंमत असेल तर त्यांनी ती बंदी घालूनच दाखवावी कर्नाटकात वीस लाख मराठी बांधव आहेत ते सगळे चवताळून उठतील, असा इशारा संजय राऊत यांनी कर्नाटक भाजपला दिला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेची खदखद असताना संजय राऊत मात्र कर्नाटक भाजपलाशी टक्कर घेताना दिसत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App