प्रतिनिधी
नाशिक – महाविकास आघाडीच्या ऐक्याची लक्तरे आतापर्यंत शहराशहरांमधल्या आणि गावागावांमधल्या वेशीवर धुतली जात होती, आता ती मुंबई हायकोर्टात धुतली जाणार आहेत. कारण छगन भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळ यांना नांदगाव मतदारसंघात पाडणारे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे आता नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टात गेले आहेत. shiv sena mla suhas kande turned to bombay high court against chagan bhujbal
महाविकास आघाडीतील नेत्यांच्या उलटसुलट वक्तव्यामुळं आधीच राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये कुरघोड्यांचे राजकारण रंगले आहे. यातून नाशिकमध्ये हे न्यायालयीन संकट उभे राहिले आहे. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे
सुहास कांदे यांच्या नांदगाव मतदारसंघात पूर आल्याने त्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन निधीतून नांदगावला मदत करण्याची मागणी केली होती. ११ सप्टेंबर रोजी भुजबळ यांनी पालकमंत्री या नात्याने नांदगावचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी कांदे यांनी तातडीने मदतीची मागणी केली होती. परंतु भुजबळ यांनी नकार दिल्याने कांदे आणि भुजबळ यांच्यात भर व्यासपीठावर खटका उडाला होता. त्या दिवसापासून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष नाशिक जिल्ह्यात पेटला आहे.
आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्या. नंतर शिवसैनिकांनी भुजबळ यांच्या विरोधात थेट घोषणाबाजी केली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. सांगली-कोल्हापूरच्या महापुरावेळी जशी मदत दिली होती, तशीच तात्काळ मदत मिळावी अशी मागणी सुहास कांदे यांनी केली होती. परंतु अद्यापही हा निधी मिळाला नसल्याने सुहास कांदे आक्रमक झाले असून त्यांनी भुजबळांविरोधात थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App