महाराष्ट्रात शिवसेना उर्दूत कॅलेंडर छापतेय. त्या कॅलेंडरमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव छापत आहे. म्हणून या कर्नाटकात जी काँग्रेस टीपू सुलतान जयंती साजरी करते त्यांना निवडून देण्याकरता शिवसेना नेते इथे आले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काँग्रेसला जिंकवण्याचा प्रयत्न सुरु आहे,अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.Shiv Sena leader in Belgaum, Devendra Fadnavis targets Sanjay Raut forcampaigning to elect those who celebrate Tipu Sultan Jayanti
विशेष प्रतिनिधी
बेळगाव : महाराष्ट्रात शिवसेना उर्दूत कॅलेंडर छापतेय. त्या कॅलेंडरमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव छापत आहे. म्हणून या कर्नाटकात जी काँग्रेस टीपू सुलतान जयंती साजरी करते त्यांना निवडून देण्याकरता शिवसेना नेते इथे आले.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काँग्रेसला जिंकवण्याचा प्रयत्न सुरु आहे,अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बेळगावात प्रचारसभेत शिवसेनेवर सडकून टीका केली. ते म्हणाले, संजय राऊत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजपवर गोळी चालवून काँग्रेसला मदत करण्यासाठी या ठिकाणी आले.
ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उरलेली नाही. इथे पोटनिवडणुक आहे. आमच्या वैनी या निवडणुकीला उभ्या आहेत. आपण सगळे दु:खात आहोत. अशा परिस्थितीत ही निवडणूक आहे. मग संजय राऊत या ठिकाणी का आले? याचं उत्तर मला सापडलं.
ढवळ्या शेजारी पवळ्या बांधल्या आणि गुण नाही तर वाण लागला, अशी अवस्था झालीय. काँग्रेसच्या सोबत राहून शिवसेनेने अजाण स्पर्धा घेतली. आम्ही महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवगाण स्पर्धा घेऊ. आम्ही छत्रपती उदयनराजे यांच्यासोबत शिवगाण स्पर्धा घेतली.
फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समिती कधीही लोकसभा निवडणूक लढवत नाही. पहिल्यांदा त्यांनी लोकसभेला उमेदवार उभा केला. मी माहिती घेतली एकही जुना माणूस महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचारात नाही. हे स्पष्ट दिसत आहे इथला मराठी माणूस भाजपला मत देतो.
ही मते कमी करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीला उभे करण्याचे काम काही लोकांनी केले आहे. त्यांचा उमेदवार स्पॉन्सरड आहे हे दिसते आहे. संजय राऊत यांचा सध्या अजेंडा काँग्रेसला जिंकवणे हा आहे. नाहीतर ही पोटनिवडणूक आहे.
ज्या ठिकाणी एक सिनियर नेते वारले, त्यांची पत्नी निवडणुकीला उभी आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती कधी निवडून येऊ शकत नाही हे माहीत आहे. समितीने कधी लोकसभा निवडणूक लढवलेली नाही. राऊतांना हे सर्व माहीत असताना ते इथे आले. कारण अलीकडे शिवसेना आणि काँग्रेस हे जवळ आले आहेत.
इतर बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App