प्रतिनिधी
मुंबई : विधिमंडळातील दोन तृतीयांश आमदारांचे संख्याबळ असलेला एकनाथ शिंदे यांचा गट आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर दावा सांगण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे कॅव्हेट दाखल केले आहे, अशी माहिती मिळत आहे. Shiv Sena is now worried about dhanushyaban sign
शिंदे गट चिन्हावरही दावा करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने आधीच विधिमंडळात शिवसेना पक्षावर दावा केला आहे. याप्रकरणी २ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर सोमवारी, ११ जुलै रोजी सुनावणी होणार होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने यावरील सुनावणी पुढे ढकलली आहे.
मात्र आता शिंदे गट शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरही दावा करेल, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यांच्याकडे शिवसेनेच्या चिन्हाबाबत कॅव्हेट दाखल केले आहे. निवडणूक चिन्ह बाबत कोणताही निर्णय घेताना आधी आमची बाजू समजून घ्या. आमची बाजू समजून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका, अशी विनंती शिवसेनेच्या ठाकरे गटाने केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App