shiv Sena Dussehara Melava : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्त पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. कोरोना महामारीमुळे यावेळी मोकळ्या जागेवर न होता शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात होत आहे. यावेळी उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. अपेक्षेप्रमाणे त्यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श करत आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. shiv Sena Dussehara Melava In Mumbai CM Uddhav Thackeray Full Speech In Marathi Read In Details
प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्त पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. कोरोना महामारीमुळे यावेळी मोकळ्या जागेवर न होता शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात होत आहे. यावेळी उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. अपेक्षेप्रमाणे त्यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श करत आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला.
भाषणाची सुरुवात करताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मला कल्पना आहे बऱ्याच दिवसांनी आपल्याला वाव मिळाला आहे. आवाज आपला कुणी दाबू शकत नाही. आवाज दाबणारा जन्माला येऊ शकत नाही. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना दसरा आणि विजया दशमींच्या शुभेच्या देतो. मलाही बरं वाटलं. कारण मला बऱ्याच दिवसांनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव आणि बघिनी आणि मातांनो अशी हाक देता आली.
आपल्या सगळ्यांचे एकत्रित आशीर्वाद घेण्यासाठी हा दिवस असतो. शस्त्रपूजन झाल्यानंतर मी माझ्या खऱ्या शस्त्रांची पुजा केली. आपल्यावर फुलं उधळली. ही माझी खरे शस्त्र आहेत. हे आशीर्वाद घेत असताना माझ्या मनात नेहमी नम्र भावना असते. प्रत्येक जन्मी हेच आई-वडील, माझा कुटुंब-परिवाह हाच मिळायला पाहिजे. आणि महाराष्ट्रात जन्म व्हायला पाहिजे. आणि मला स्वत:ला मी मुख्यमंत्री आहे, असं कधीच वाटू नये. माझं तर सोडाच तर माझ्या तमाम जनतेला मी मुख्यमंत्री आहे असं कधीच वाटता कामा नये. मी घरातलाच आहे, मी तुमचा भाऊ आहे, असं वाटो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. कारण काही जणांना असं वाटतं जे बोलत होते पुन्हा येईल ते बोलत आहेत मी गेलोच नाही. बस आहे तिकडेच. पण जे संस्कार आणि संस्कृती असते ती हीच असते. पदं आणि सत्ता काय आहेत? पदं येतील जातील. पण कधीही अहमपणा कधी डोक्यात येऊ देऊ नको. ज्यादिवशी डोक्यात हवा जाईल, त्यादिवशी तू संपलास, अशी माझ्या वडील आणि आजोबांची शिकवण आहे.”
“मी जनतेशी नेहमी नम्र राहत असतो. आशीर्वाद घेत असतो. हाच आशीर्वाद तर ताकद आहे. हे मागून कुणाला मिळत नाही. हे खरं वैभव आणि ऐश्वर्य आहे. हे जोरजबरदस्तीने मिळत नाही. ती कमवण्याची परंपरा मिळालेली आहे. मला काही गोष्टीचं नवल वाटतं, आजसुद्धा मी काय बोलणार कोणाचा समाचार घेणार, कोणाचे वाभाडे काढणार, बऱ्याच दिवसांनी बोलतोय, एकतर मनामध्ये विषयांची गर्दी झालीय. पण पंचायत अशीय की कोरोनामध्ये गर्दी झालीय. बरं गर्दीमध्ये दोन लसी घेतल्यात कारे बाबा? असं विचारु शकत नाही. मास्क कसा घालणार विचारणार. पण तरी मला हेही माहिती आहे माझ्या भाषणानंतर अनेकजण माझं भाषण संपतंय कधी आणि चिरकायला मिळतंय कधी, तोंडामध्ये बोंडकं घालूनच बसले आहेत. माझं भाषण संपतंय कधी आणि चिरकायला मिळतंय कधी? चिरकू द्या. त्यांना उत्तर देण्यासाठी मी त्यांच्याशी बोलत नाही.”
दसरा मेळावा – २०२१ https://t.co/FRGcUiJQJx — ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 15, 2021
दसरा मेळावा – २०२१ https://t.co/FRGcUiJQJx
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 15, 2021
एक विकृती हल्ली आलेली आहे. मला असं वाटायला लागलं आहे, हे जे चिरकणं आहे, मग ठाकरे कुटुंबीयांवर हल्ले, हल्ले म्हणजे असा कुणी मायेचा पुत जन्माला आलेला नाही जो ठाकरेंवर हल्ला करेल, तिथल्या तिथे ठेचून टाकू त्याला. पण काहीही वाटेल ते बोलायचं, कुटुंबीयांना बदनाम करायचं हे आता त्यांचं रोजगार हमीचं काम झाल आहे. काय करणार? कोरोनात सगळं बंद झालंय. मग तू चिरकलास किती? हे त्याचे पैसे. तुम्ही चिरकत राहा. पण माझा वाडा चिरेबंदी आहे. टकरा मारा, मुसंड्या मारा, डोके फुटतील पण तडा जाणार नाही.
आज दोन मेळावे असतात. एक आपला आणि दुसरा आरएसएसचा. आपले विचार एक आहेत. पण धारा वेगळ्या असू शकतात. विचार एक होत्या, आहेत म्हणूनच भाजपसोबत युती केली होती. ज्यांना अजूनही वाटतं ते मुख्यमंत्री राहिले असते, कदाचित राहिले असते. जर तुम्ही शिवसेनेला दिलेलं वचन मोडलं नसतं तर तुम्हीसुद्धा आज नाहीतर उद्या मुख्यमंत्री राहिले असता. पण नशिबात नव्हतं म्हणून तुम्ही वचन तोडलंत. मी हे पद स्वीकारलं ते एका जबाबदारीने स्वीकारलं. मी केवळ माझ्या पित्याला दिलेलं वचन म्हणून मी हे पद स्वीकारलं. शिवेसेना प्रमुखांना दिलेलं वचन, तुमचा शिवसैनिक मी मुख्यमंत्री करून दाखवेल, खरंतर ते वचन अजून पूर्ण झालेलं नाही. पण ते वचन मी पूर्ण करून दाखवेनच. ही जबाबदारी मी मोठ्या विचाराने घेतलेली आहे. कदाचित दिलेलं वचन त्यांनी पाळलं असतं शिवसैनिक मुख्यमंत्री केला असता तर मी या राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो. हे क्षेत्र माझं नाही, अशी माझ्यावर टीका होते. हो हे माझं क्षेत्र नाही. मी एक पुत्र कर्तव्य निभावण्यासाठी या क्षेत्रात आलो आहे. आणि पाय रोवून ठामपणाने उभा राहिलो आहे. जी जबाबदारी खांद्यावर आहे ती ठामपणे पार पाडल्याशिवाय राहणार नाही, या जबाबदारीने मी उभा राहिलेलो आहे.
मोहन भागवतांचे विचार, त्यांनी म्हटलेलं आहे, हिंदुत्व म्हणजे काय त्यांनी म्हटलेलं खरंय. आपल्या सर्वांचे पूर्वज एक होते. आता एकदम पूर्वजांर्यंत जात नाही. नाहीतर माकडापर्यंत पोहोचू आपण. या देशापुरता विचार करायचा झाला तर आपले पूर्वज एकच होते. हे जर आपल्याला मान्य करायचं असेल तर विरोधी पक्षाचे पूर्वज काही परग्रहावरुन आले होते का? आता जे शेतकरी आंदोलन करत आहेत त्यांचे पूर्वज परग्रहातून आले होते का? लखीमपूरला जे शेतकरी दिवसाढवळ्या मारले त्यांचे पूर्वज परग्रहातून आले होते का? हा जो विचार आहे. आपण सगळे एक आहोत. आम्ही कुणाचा द्वेष, मत्सर करत नाहीत. पण हे जे दिवसाढवळ्या दिसतंय ते मोहनजी तुम्हाला मान्य आहे का? मी जनतेला विचारतो तुम्हाला तरी हे मान्य आहे का? जे मी शस्त्रपुजा म्हणून तुमची पुजा करायची आहे.
सर्वसामान्य माणसाला मला तेच सांगायचं आहे की, तू सर्वात ताकदवान आहेस, तुझ्या हातात लोकशाहीने दिलेलं जे शस्त्र आहे ते मत. हे मत एका क्षणात रावाचं रंक आणि रंकाचा राव करु शकतं. इतकी ताकद तुझ्या मनगटात आहे. तू दुबळा नाहीस. त्यानंतर त्यांनी जे काही पुढे सांगितलं आहे, हिंदुराष्ट्र शब्द जेव्हा वापरतो त्यात सत्ता मिळवण्याची लालसा नसते. पण तुमच्या वितारातून जे लोकं बाहेर पडले आहेत, सत्ता काबीज करुन बसले आहेत त्यांना ही शिकवणी परत लावा एकदा. सध्या जो खेळ सुरु आहे वाट्टेल ते करायचं पण मला सत्ता पाहिजे. व्यसनाधीनता हा जो प्रकार आहे, अंमली पदार्थ हा वेगळा प्रकार आहे. त्याचा नायनाट केलाच पाहिजे. पण सत्तेचं व्यसन हा सगळा अंमली प्रकारच आहे. अगदी बाजार समित्यांपासून लोकसभेपर्यंत माझ्याच अंमलाखाली पाहिजे हा सुद्धा एक अंमली प्रकारच आहे. या अंमली प्रकाराचा बंदोबस्त कोण करणार?
आपल्या हक्काच्या सरकारला दोन वर्ष पूर्ण होतील. अनेक प्रयत्न केले. फोडण्याचे-पाडण्याचे प्रयत्न केले. मी तर आज सुद्धा सांगतो हिंमत असेल तर पाडून दाखवा. पण तसं करुन पडत नाही. आपल्याकडे एक खेळ आहे, छापा की काटा, छापा टाकला की काटा काढायचा. हे जास्त थेरं चालू शकत नाही. हा देशाचा स्वातंत्र्य महोत्सवाचा अमृतमहोस्तव सुरु आहे. त्यावेळेला जसा संपूर्ण देश पेटला होता त्या देशात महाराष्ट्र लाल-बाल आणि पाल पुढे होता. महाराष्ट्र, पंजाब आणि बंगाल स्वातंत्र्यलढ्यात पुढे होता. बंगालने त्यांचं कर्तृत्व दाखवलेलं आहे. मी खरोखरच बंगाली जनतेला आणि ममता दिदींना धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो आहे. तुम्ही न झुकण्याची जिद्द कायम ठेवलेली आहे. ती जिद्द आपल्या सुद्धा रगारगात आणि रक्तात तयार ठेवावी लागेल. हरहर महादेव म्हणजे काय असतं ते पुन्हा एकदा दिल्लीच्या तक्त्याला दाखवायची वेळ येऊ नये. पण आलीच तर दाखवावंच लागेल. मग हा सत्ता पिपासूपणा नाहीय? यात कुठला विचार आहे. मला दु:ख, राग का येतो? मगाशी मी उल्लेख केला की शिवसेनेला बदनाम करणारी लोकं तोंडामध्ये बोंडकं घालून बसले असतील, अरे जर 92-93 साली शिवसैनिक हे मर्द उतरले नसते तर तुम्ही कुठे असते हे कळलं तरी असतं का?
या देशात हिंदुत्व धोक्यात आहे का? अशी माहिती माहितीच्या अधिकारात माहिती मागवली गेली. केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितलं की, हिंदुत्वाला तसा धोका नाहीय. याच तर दिवसाची आणि क्षणाची आपण वाट बघत होतो. पण हिंदुत्वाला आता धोका नाही म्हटल्यानंतर आता खरं हिंदुत्व धोक्यात आहे. तो धोका परकीयांपासून नाही तर हे उपटसुंभ नव हिंदू जे उगवले आहेत त्यांच्यापासून त्यांना खरा धोका आहे. राजनाथ सिंग यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केलं. कशाला जाताय? सावरकर आणि गांधी शब्द उच्चारण्याची लायकी तरी आहे का? गांधीजी समजले की सावरकर समजले?
shiv Sena Dussehara Melava In Mumbai CM Uddhav Thackeray Full Speech In Marathi Read In Details
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App