विशेष प्रतिनिधी
पुणे : शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे जनरल सेक्रेटरी रघुनाथ कुचिक यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी शारीरीक संबंध ठेऊन तिला गरोदर केले. जबरदस्तीने गर्भपात करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 24 वर्षाच्या तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार मॉडेल कॉलनीतील प्रबोधन फाऊंडेशन, प्राईड हॉटेल, गोव्यातील बेलीझा बाय दी बीच हॉटेल येथे 6 नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारी 2022 दरम्यान घडला. कुचिक यांनी या तरुणी सोबत प्रेमसंबंध निर्माण करुन लग्नाचे आमिष दाखवले. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिच्याशी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ही तरूण गरोदर राहिली. तेव्हा त्यांची संमती नसताना जबरदस्तीने गर्भपात केला.
या बद्दल कोणाला सांगितले तर तुला मारुन टाकील, अशा धमक्या दिल्या आहेत. या तरुणीची तब्येत ठीक नसताना तिच्याकडून समजुतीच्या करारनाम्यावर सह्या करुन घेतल्या. शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 376, 313, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App