प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांचे राज्यसभेचे मतांचे गणित जुळले नाही. त्यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधत निवडणुकीतून माघार जाहीर केली. Shiv Sena – Congress leaders who used to enjoy NCP for a long time have now spoken !!
या सगळ्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीच्या मुद्द्यावर शांतपणे बसून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची मजा पाहणारे काँग्रेसचे नेते आज मात्र बोलले आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एकाच वेळी संभाजीराजे यांच्या राज्यसभा निवडणुकीतील माघारी वरून प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी तर संभाजीराजे यांना भाजपने उमेदवारी द्यावी, अशी जाहीर सूचना केली आहे. बाळासाहेब थोरात यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे. संभाजीराजे यांना महाविकास आघाडीने पुरस्कृत उमेदवारी जाहीर करावी, अशी सूचना मी मुख्यमंत्र्यांना केली होती. पण राज्यसभेची सहावी जागा शिवसेनेची असल्याने त्यांनी स्वतःचा निर्णय घेतला, असे खोचक उद्गार बाळासाहेब थोरात यांनी काढून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. नाना पटोले यांनी देखील संभाजीराजे यांना शिवसेनेने पाठिंबा द्यायला काय हरकत होती?, असा सवाल करून शिवसेनेला टोचले आहे.
– काँग्रेसकडे मते नाहीत, नुसत्याच प्रतिक्रिया
काँग्रेस हा महाराष्ट्र चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे. त्यांचे विधानसभेत 44 आमदार आहेत. राज्यसभा निवडणुकीत त्यांच्या मतांचा कोटा फक्त त्यांच्याच पक्षाचा एक खासदार निवडून आणण्यात इतपतच पुरेसा आहे. काँग्रेसकडे जादा मते नाही. त्यामुळेच गेले काही दिवस संभाजीराजे यांच्या उमेदवारीवरून उमेदवारीच्या मुद्द्यावर काँग्रेसचे नेते गप्प बसून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या राजकारणाची मजा घेत होते. पण आता शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यातली राजकीय दरी रुंदावताच काँग्रेस नेते उघडपणे बोलायला पुढे आले आहेत.
– पवारांविषयी मौन
संभाजीराजे यांना जादाची मते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देऊ केली होती. पण नंतर त्यांनी भूमिका बदलली. शिवसेनेच्या सहाव्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. या विषयी संपूर्ण पत्रकार परिषद संभाजीराजे यांना प्रश्न विचारला नाही. संभाजीराजे यांनी देखील सिलेक्टीव्ह भूमिका घेत फक्त मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले आणि आता काँग्रेसचे नेते देखील मुख्यमंत्र्यांनाच अप्रत्यक्षपणे टार्गेट करत आहेत. यातून महाविकास आघाडीमधले राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन घटक पक्ष स्वतःचे वेगळे राजकारण साधून घेताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App