प्रतिनिधी
नवी मुंबई : महाविकास आघाडीची सायंकाळी नागपुरात वज्रमूठ सभा होत आहे. नागपुरात त्यांचे शक्तिप्रदर्शन होण्यापूर्वीच शिंदे – फडणवीस सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने मुंबईतल्या खारघरच्या मैदानावर त्याहीपेक्षा प्रचंड शक्तिप्रदर्शन केले आहे. Shinde-Fadnavis government’s show of strength on the occasion of Harashtra Bhushan
रायगडच्या भूमीतून महाराष्ट्रातल्या तीन महत्त्वाच्या धारा विकसित झाल्या आणि त्यांनी संपूर्ण देशाला दिशा दाखवली, त्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून निर्माण झालेली देशभक्तीची धारा लोकमान्य टिळक, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, वीर सावरकर यांनी चालविली. भक्तीची धारा समर्थ रामदास स्वामी, जगद्गुरु तुकाराम महाराज, नामदेव महाराज यांनी भक्तीची धारा चालवली, तर महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज सुधारण्याचे धारा चालविली. याच समाजसेवेची धारा आप्पासाहेब पुढे चालवत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.
नवी मुंबईच्या खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर महाराष्ट्र भूषण सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्र भूषण हा राज्य शासनाच्यावतीनं देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण २०२२ ने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आप्पासाहेब यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी खारघर येथे जवळपास २० लाखांपेक्षा अधिक अप्पासाहेबांच्या अनुयायांनी हजेरी लावली. त्याचसोबत अनेक मान्यवर व्यक्ती देखील तिथे उपस्थित होते.
महाराष्ट्र: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने नवी मुंबई के खारघर में महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रम में शामिल हुए। गृह मंत्री अमित शाह सामाजिक कार्यकर्ता अप्पासाहेब धर्माधिकारी को राज्य के सर्वोच्च नागरिक सम्मान से सम्मानित करेंगे। pic.twitter.com/NyrKQzuKTl — ANI_HindiNews (@AHindinews) April 16, 2023
महाराष्ट्र: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने नवी मुंबई के खारघर में महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रम में शामिल हुए।
गृह मंत्री अमित शाह सामाजिक कार्यकर्ता अप्पासाहेब धर्माधिकारी को राज्य के सर्वोच्च नागरिक सम्मान से सम्मानित करेंगे। pic.twitter.com/NyrKQzuKTl
— ANI_HindiNews (@AHindinews) April 16, 2023
या सोहळ्याची इतिहासात नोंद घेतली जाईल, ना भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम झाला,” असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पुरस्कार देताना डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याची एक ध्वनिफित यावेळी दाखवण्यात आली. यावेळी त्यांनी राबवलेल्या स्वच्छता अभियाने, मंदिरांचे तलाव, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन अशा अनेक कामांचं कौतुक करण्यात आलं. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेले रक्तदान शिबिराचे कौतुक करण्यात आले.
या सोहळ्यादरम्यान, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.
सोहळ्याच्या ठिकाणी सुमारे २५० टॅंकर आणि २१०० नळ बसविण्यात आले आहेत. वैद्यकीय सुविधा देखील तैनात करण्यात आली असून ६९ रुग्णावाहिका, ३५० डॉक्टर्स, १०० नर्स आणि कर्मचारी कार्यरत आहेत. ३२ फिरते शौचालय, ४२०० पोर्टेबल शौचालय, कार्यक्रमस्थळी ९००० तात्पुरते शौचालय बांधण्यात आली आहेत. स्वच्छता व्यवस्थेसाठी ६० जेटींग मशीन, ४००० सफाई कर्मचारी शिवाय २६ अग्निशमन वाहने उपलब्ध आहेत. पार्कींगसाठी २२ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी ६०० स्वयंसेवक, २०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
नागपुरात आज सायंकाळी महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा होत आहे. या सभेला उद्धव ठाकरे, अजितदादा पवार यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत. हे महाविकास आघाडीचे दुसरे शक्तिप्रदर्शन आहे. परंतु या शक्तिप्रदर्शनापूर्वी शिंदे – फडणवीस सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने नवी मुंबईतील खारघरच्या मैदानावर भव्य शक्तिप्रदर्शन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App