पवारांच्या इशाऱ्यावर राऊतांनी शिवसेना संपवण्याचा उचलला विडा; खासदार प्रताप जाधवांचा आरोप

प्रतिनिधी

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात शिंदे – फडणवीस सरकारची स्थापना झाली. या बंडानंतरही शिंदे गटात इनकमिंग सुरू असून ठाकरे गटात हळूहळू गळती होत आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाशी पीपल्स रिपब्लिकन पार्टीने हातमिळवणी करून युती जाहीर केली. Shinde faction MP pratap jadhav alleges Sanjay Raut destroying Shivsena at the instance of sharad Pawar

आगामी निवडणुकांपूर्वी ठाकरे गट रिकामा होण्याचे प्रतिपादन शिंदे गटाचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधवांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या इशाऱ्यावरून संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलल्याचा आरोप जाधवांनी माध्यमांशी बोलताना केला.


Sanjay Raut ED Action : ईडीचा दणका बसताच संजय राऊतांना आठवले महात्मा गांधी आणि हरेन पांड्या!!


खासदार प्रताप जाधव म्हणाले की, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलेला आहे. शरद पवारांच्या इशाऱ्यावरून राऊत हे करत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून दिसत आहे. राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या मागचं सैन्य रिकामी केलं आहे. आता शिल्लक सेना राहिली आहे. तीही काही दिवसांत आमच्यात (शिंदे गटात) विलीन होईल. जसजशा निवडणुका जवळ येतील, तसतसा शिल्लक राहिलेला ठाकरे गट संपूर्ण रिकामा झालेला दिसेल.

ठाकरे गटाच्या तिसऱ्या आमदाराला ACB ची नोटीस

ठाकरे गटाचे राजन साळवी, वैभव नाईक यांच्यानंतर ठाकरे गटाचे तिसरे आमदार नितीन देशमुख यांना संपत्तीच्या चौकशीसाठी एसीबीने नोटीस जारी केली आहे. या नोटीसीच्या माध्यमातून नितीन देशमुखांना १७ जानेवारीला अमरावती परिक्षेत्र कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला आहे. एकापाठोपाठ एक आमदारांना तपास यंत्रणेच्या नोटीसी येत असल्याने ठाकरे गटात खळबळ माजली आहे.

Shinde faction MP pratap jadhav alleges Sanjay Raut destroying Shivsena at the instance of sharad Pawar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात