प्रतिनिधी
मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकार जाणार की राहणार??, या मुद्द्यावर महाविकास आघाडीचे दोन महत्त्वाचे नेते खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार हे दोघेच आमने-सामने आले आहेत. या दोन्ही नेत्यांनी परस्पर विरोधी वक्तव्य केली आहे. त्यामुळे सरकार जाईल की राहील??, यापेक्षा महाविकास आघाडीत उत्पन्न झालेली दरार जास्त ठळक दिसत आहे.shide thackeray crises supreme courtSanjay Raut and ajit Pawar Pawar differences emerged on Supreme court verdict
सुप्रीम कोर्टाचा निकाल काहीही लागला तरी जोपर्यंत शिंदे – फडणवीस सरकारला 145 आमदारांचा पाठिंबा आहे, तोपर्यंत सरकारला धोका नाही, असा विश्वास अजितदादा पवार यांनी व्यक्त केला होता.
अजितदादांच्या या वक्तव्यालाच संजय राऊत यांनी आज मुंबईतल्या पत्रकार परिषदेत छेद दिला आहे .अजितदादा विरोधी पक्ष नेते आहेत. सरकारला 145 आमदारांचा पाठिंबा असण्याचे त्यांचे वैयक्तिक मत आहे. पण आमचे म्हणणे शिवसेनेचा ठाकरे गट म्हणून आमचे म्हणणे असे आहे, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र झाले, त्यांच्याबरोबरचे 16 आमदार झाले की आपोआपच उरलेले 24 आमदारा पात्र होतात. त्यामुळे शिंदे – फडणवीस सरकार कोसळणारच, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. सुप्रीम कोर्ट आमदार पात्रतेचा निर्णय तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी शिरवळ यांच्याकडे सोपवेल. तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापर्यंत येणारच नाही, असा दावाही संजय राऊत यांनी केला.
आमदार अपात्रेचा निर्णय आपल्याकडेच येईल असे वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केले होते. मात्र असे वक्तव्य करणे मूर्खपणाचे आहे, असा दावा संजय राऊत यांनी करताना देवेंद्र फडणवीस यांच्या अशी चर्चा मूर्खपणाची आहे, या वक्तव्याचा हवाला त्यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App