प्रतिनिधी
मुंबई : एकनाथ शिंदे यांचे बंड थंड करण्यासाठी त्यांनाच मुख्यमंत्रिपदाची ऑफर द्या, असा सल्ला शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना दिल्याची बातमी आली आहे. फेसबुक लाईव्ह पूर्वी मुख्यमंत्र्यांशी शरद पवार फोन वरून बोलले तेव्हा त्यांनी हा सल्ला दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्हचे स्क्रिप्ट शरद पवारांनी लिहिल्याचे स्पष्ट होत आहे Sharad Pawar’s advice to Uddhav Thackeray to offer the post of Chief Minister directly to Eknath Shinde
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३५ आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे शिवसेनेला जबरदस्त धक्का बसला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा सल्ला दिल्याचे पुढे आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होत आहे. या भेटीआधी दोन्ही नेत्यांचे फोनवरून संवाद साधला. या संवादात सरकार वाचवायचे असेल तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सरकार वाचवण्यासाठी पवारांचा सल्ला
सरकार अल्पमतात असल्याने पवारांनी हा सल्ला दिला आहे. शिंदे गटाचा पाठिंबा घेऊन भाजपा पडद्यामागून सत्ता स्थापनेच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे फेसबुक लाईव्हमधून उद्धव ठाकरेंनी सूचक विधान केले. जर माझे मुख्यमंत्रिपद नको असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मला आनंद आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले. नेमका हाच सल्ला पवारांनी दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागेल. पण शिवसेनेचे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी बरोबरचे सरकार वाचेल, असे पवार मुख्यमंत्र्यांना मिळाल्याचेही समजते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App