विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कथित बंडानंतर सामना पासून शरद पवारांच्या गटापर्यंत तसेच काँग्रेसमधल्या काही नेत्यांनी अजित पवारांना भाजपने मुख्यमंत्री पदाचा शब्द दिले असल्याचे “स्क्रिप्ट” लिहिले आहे… हे “स्क्रिप्ट” त्यांनी लिहिली आहे ज्यांची आतापर्यंतची सर्व “स्क्रिप्ट” सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर खोटी ठरली. संजय राऊत, स्वतः शरद पवार, रोहित पवार, पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांनी अजितदादांना भाजपने मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिल्याचा दावा केला आहे, पण यापैकी काही नेत्यांनी आधीची कोणतीही “स्क्रिप्ट” खरी ठरली नाही, हेच नजीकच्या काळातला इतिहास सांगतो. Sharad pawar’s ability and capacity questioned in ajit pawar rebellion
संजय राऊत यांनी दिल्लीत जाऊन हाच मुद्दा मांडला. म्हणे, अजित पवारांना भाजपने मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला आहे. रोहित पवारांना आजचे राजकारण फार गलिच्छ दिसले. पृथ्वीराज चव्हाण कराडच्या नाक्यावर पवारांच्या स्वागतासाठी उभे राहिल्यानंतर त्यांनी देखील अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा शब्द भाजपने दिल्याची आपली माहिती असल्याचे सांगितले.
‘’अजित पवारांचे विचार वेगळे आणि आमचे वेगळे, जे काही घडले ते…’’ सुप्रिया सुळेंचं माध्यमांसमोर विधान!
या तीनही नेत्यांच्या वक्तव्यातून एक बाब स्पष्ट झाली ती म्हणजे भाजपने भले अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला असेल अथवा नसेल, जो खऱ्या अर्थाने कोणालाच माहिती नाही, पण जर अजितदादांना भाजपने मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला असेल, तर भाजपच्या नेत्यांमध्ये तो शब्द खरा करून दाखवण्याची क्षमता आणि हिंमत आहे. मग तशी क्षमता आणि हिंमत शरद पवारांमध्ये का नाही?? अजितदादा मुख्यमंत्री पदासाठी महत्त्वाकांक्षी आहेत. त्यांची महत्त्वाकांक्षा त्यांना राष्ट्रवादी पक्षात ठेवूनच शरद पवार पूर्ण का करू शकत नाहीत?? आपली मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा पूर्ण करून घेण्यासाठी अजितदादांना भाजपची वळचण का शोधावी लागते??, हे मूलभूत प्रश्न आहेत.
अजितदादांपुढे पक्ष सरेंडर
या प्रश्नांची उत्तरे पत्रकारांनी वर उल्लेख केलेल्या कोणत्याही नेत्याला विचारले नाहीत. त्यामुळे त्यांनी त्याची उत्तरे दिली नाहीत. पण पवारांनी आज कराडच्या वाटेवर चिन्ह गेले तरी चालेल आम्ही जनतेच्या कोर्टात जाऊ, असे वक्तव्य करून आपला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजितदादांपुढे सरेंडर केल्याचे सूचित केले.
याचा अर्थ असा दुसरा अर्थच असा की आपण अजितदादांची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा त्यांना राष्ट्रवादीत ठेवून पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे अजितदादांनी स्वतःचा मार्ग आपलाच पक्ष घेऊन मोकळा करून घ्यावा. बाकीचे आपण विरोधी राजकारण करण्याचा प्रयत्न करत राहू, असेच पवारांनी न बोलता आपल्या राजकीय कृतीतून सूचित केल्याचे स्पष्ट होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App