Script 1 : पोस्टर्सवर पवारांचे फोटो लावा अजितदादांचे आदेश; चिन्ह गेलं तरी चालेल, आम्ही जनतेच्या कोर्टात जाऊ!!; पवारांकडून पक्ष अजितदादांकडे सरेंडर!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांनी कथित बंड करून 24 तास उलटल्यानंतर अजित पवारांनी आपल्या समर्थकांना त्यांच्या पोस्टर्स शरद पवारांचे फोटो लावा, असे आदेश दिले, तर त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह गेले तरी चालेल आम्ही जनतेच्या कोर्टात जाऊ असे वक्तव्य शरद पवारांनी कराडच्या वाटेवर असताना केले यातून आजची “स्क्रिप्ट” लिहिली गेली आहे. पक्ष स्वतःहून शरद पवारांनी अजितदादांकडे सरेंडर केल्याची ही चिन्हे आहेत. Sharad pawar surrender his NCP to ajit pawar

अजित पवारांनी ज्या आत्मविश्वासाने शरद पवारांचे फोटो पोस्टर्स वर लावा, असे सांगितले आहे. त्यातून पवारांचा अजितदादांना “आतून” पाठिंबाच आहे. कारण त्याशिवाय त्यांची मंत्रिपदाची अथवा मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार नाही, याची जाणीव पवारांना झाली आहे. सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व पक्षावर थोपविण्याचा प्रयत्न झाला तरी तो फारसा यशस्वी होत नाही, हेही पवारांना लक्षात आले आहे. त्यामुळे पक्ष अजितदादांपुढे सरेंडर करण्याचा मार्ग पवारांनी स्वीकारला आहे, अशीच राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


shivsena – NCP : आत्तापर्यंत शिवसेनेच्या राष्ट्रवादी विरोधात कुरबुरी; आता राष्ट्रवादीच्या शिवसेने विरोधात तक्रारी!!


शिवाय शरद पवारांना कोणत्याही स्थितीत समोरून राजकारण करता येत नाही. दिल्ली दरवाजा उघडा असेल तरी जांभळी किंवा चाफ्याच्या दरवाजातूनच जायची त्यांची जुनी सवय आहे किंबहुना उघड्या दिल्ली दरवाजाच्या दिंडी दरवाजा उघडूनच ते राजकारण करतात, असे आत्तापर्यंत दिसले आहे.

आजच्या स्क्रिप्ट मध्ये अजितदादांनी पोस्टर्स वर शरद पवारांचे फोटो लावा असे सांगणे आणि पक्ष चिन्ह गेले तरी चालेल आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ, असे पवारांनी म्हणणे यातूनच पवारांनी स्वतःहून अजितदादांना राष्ट्रवादी काँग्रेस आंदण देऊन टाकल्याचे दिसून येते. मग भले जितेंद्र आव्हाड यांनी काल शरद पवारांचा प्लॅन “बी” म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे रात्री धाव घेऊन त्यांना 9 मंत्र्यांच्या अपात्रतेच्या संदर्भात पत्र दिले असले, तरी त्यावर विधानसभा अध्यक्षांची मोहर अजून उमटायची आहे.

त्याच वेळी सुप्रिया सुळे यांनी काल जी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेत अजितदादांची आपले भावनिक नाते कसे आहे याचे सविस्तर वर्णन करताना अजितदादांशी नेमके देवगिरी बंगल्यावर काय बोलणे झाले हे मात्र सांगणार नाही, असे स्पष्ट करून दोघांचे झालेले बोलणे “गुलदस्त्यात” ठेवले त्यामुळे हे सगळे “स्क्रिप्टेड” आहे आणि त्या स्क्रिप्ट मध्ये शरद पवार, अजित पवार पवार हे छोटे घटक आहेत, या सिनेमाचे निर्माते फार मोठे आहेत, असेच दिसून आले.

Sharad pawar surrender his NCP to ajit pawar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात