राष्ट्रवादीतले अधोरेखित 3 : 83 वर्षांचा योद्धा मैदानात; पण 54 वर्षांची योद्धा अजूनही “राजकीय कवचात”!!

राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा अख्खा पक्ष पुतण्याने नेला. पक्षाध्यक्ष पद गेले. आयुष्यभर सत्तेच्या वळचणीचे राजकारण करून कारकीर्दीच्या अखेरीस आपण “तत्वासाठी” लढतोय, हे दाखवण्याची वेळ आली, तरी 83 वर्षांचा योद्धा अजून मैदानातच आहे आणि 54 वर्षांची योद्धा अजूनही “राजकीय कवचातच” आहे, हे राष्ट्रवादीतले तिसरे अधोरेखित आहे!! Sharad pawar trying to keep supriya sule in politically secured shield

राष्ट्रवादी काँग्रेस मधली खरी लढाई सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार अशी आहे. पण शरद पवारांनी ती राजकीय चलाखी दाखवून स्वतःवर ओढवून घेतली आहे. वास्तविक त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या ऐवजी अजित पवारांकडे महाराष्ट्राची सूत्रे दिली असती, तर अजित पवारांनी बंडही केले नसते. मग शरद पवारांचा चाणक्यगिरीचा इतिहास जसाच्या तसा “इन्टॅक्ट” राहिला असता. त्याचे वाभाडेही निघाले नसते. पण पवारांनी अजितदादांच्या हाती महाराष्ट्रातली सूत्रे दिली नाहीत. पवारांनी पुतण्या की मुलगी यामध्ये मुलगी “हाच पर्याय” निवडला आणि पुढचा इतिहास घडला!!

गेली कित्येक वर्षे मराठी माध्यमांनी उभी केलेली काकांची चाणक्यगिरी पुतण्याने 5 जून 2023 रोजी उद्ध्वस्त करून टाकली, पण “सुंभ जळाला, तरी पिळ जात नाही”, या मराठी म्हणीनुसार 83 वर्षांचा योद्धा आजही मैदानात उतरलाय, तो देखील 54 वर्षांच्या योद्ध्याला “राजकीय कवचात” “सुरक्षित” ठेवण्यासाठीच!!

सुप्रिया सुळे यांच्याविरुद्धची अजित पवारांची लढाई शरद पवारांनी स्वतःवर ओढून घेऊन सुप्रिया सुळेंना अजित पवारांच्या राजकीय हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न पुरता यशस्वी झाला, असे म्हणता येत नाही. पण त्या तुलनेने “सुरक्षित” राहिल्या ही वस्तुस्थिती आहे.

पण त्या पलीकडे जाऊन स्वतः सुप्रिया सुळे यांनी 83 वर्षांचा योद्धा मैदानात उतरल्याचे यशवंतराव चव्हाण मधल्या भाषणात जे “कौतुक” केले, त्याला महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात “तोड” नाही!!



 

– फारूक अब्दुल्लांचे उदाहरण

86 वर्षांच्या फारूक अब्दुल्लांचे उदाहरण देऊन त्यांनी शरद पवारांना आजही “आघाडीवर” राहूनच लढायला सांगितले. फारूक अब्दुल्ला शरद पवारांपेक्षा 3 वर्षांनी मोठे आहेत. मग फारूक अब्दुल्ला जर लढू शकतात, तर शरद पवार का नाही लढू शकत??, असे त्यांनी फारूक अब्दुल्लांचाच हवाला देत सांगितले… पण फारूक अब्दुल्लांनी आपल्या मुलाला मुख्यमंत्री करून आणि त्याची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द संपून काही वर्षे उलटली, हे “गुपित” मात्र सुप्रिया सुळेंनी सांगितले नाही. ओमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे आता माजी मुख्यमंत्री आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी जम्मू-काश्मीरची निवडणूक एकदा यशस्वी लढवून सत्ताही मिळवली होती, हे “गुपित” सुप्रिया सुळे यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर मधल्या भाषणातून “दडवून” ठेवले!!

हा इतिहास असताना त्या राजकीय कर्तृत्वाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे आत्ता कुठे आहेत?? त्या आघाडीवर येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करताहेत का??… त्या तर अजूनही 83 वर्षाच्या योद्ध्याला मैदानात उतरायला सांगून स्वतः “राजकीय कवचात” बसूनच लढाई करत आहेत… वर हीच महिला पदर खोचून अहिल्या बनते, झाशीची राणी बनते, जिजाऊ बनते, अशी भाषणे देत आहेत!!

पण अहिल्या, झाशीची राणी आणि जिजाऊ या आघाडीवर राहून लढल्या. त्यांनी त्यांच्या वडिलांना 83 वर्षांचा योद्धा मैदानात असे म्हणून आघाडीवर लढायला पाठवले नव्हते, हे 54 वर्षांची योद्धा विसरली!!

– सुप्रिया सुळे यांचे राजाकीय प्रोफाईल

शरद पवार 38 व्या वर्षी मुख्यमंत्री बनले. मग भले त्यासाठी त्यांना वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसावा लागला, तो आरोप त्यांना आयुष्यभर सहन करावा लागला, पण म्हणून पवारांचे 38 व्या वर्षी मुख्यमंत्री बनण्याचे कर्तृत्व नाकारता येणार नाही. मग पवारांच्या या तरुण वयातल्या राजकीय कर्तृत्वाच्या पार्श्वभूमीवर वयाच्या 54 व्या वर्षी सुप्रिया सुळे यांचे राजकीय प्रोफाईल काय आहे?? बारामतीच्या खासदार, फार तर तीन टर्म खासदार आणि आता शरद पवारांनी नेमलेल्या, पण पक्ष अस्तित्वात आहे का नाही?, अशा अवस्थेत पोहोचलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा या दोनच ओळीत त्यांचे राजकीय प्रोफाईल संपते… आणि तरी देखील स्वतःचे राजकीय प्रोफाईल विस्तारण्याऐवजी त्या 83 वर्षांच्या योद्ध्याला मैदानात उतरायला सांगताहेत!!

मग 54 वर्षांच्या योद्धाचे राजकीय कर्तृत्व कधी पुढे येणार?? ते कधी बहरणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर कधी “इम्पॅक्ट” करणार?? हा मूलभूत प्रश्नच आहे. पण या प्रश्नापेक्षा राष्ट्रवादीतल्या लढाईतले हे खरे अधोरेखित आहे!!

Sharad pawar trying to keep supriya sule in politically secured shield

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात