Gurpatwant Singh Pannu: अमेरिकेत कार अपघातात खलिस्तानी दहशतवादी पन्नूचा मृत्यू झाल्याचा दावा!


भारतासाठी होता ‘मोस्ट वाँटेड’; UAPA कायद्यानुसार दहशतवादी घोषित केले होते.

विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : भारतातील बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा कुख्यात नेता गुरपतवंत सिंग पन्नू याचा अमेरिकेत रस्ता अपघातात मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेतील हायवे 101 वर त्याच्या कारला अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. Khalistani terrorist Pannu died in a car accident in America

प्रदीर्घ काळ भूमिगत राहून पन्नू भारतविरोधी कारवायांमध्ये सामील होता, असे सांगितले जाते. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर, अवतार सिंग खांडा यांच्याप्रमाणे आपल्यालाही लक्ष्य केले जाऊ शकते, अशी भीती त्याला होती. गुरपतवंत सिंग पन्नू हा सोशल मीडियावर भारताविरुद्ध विष ओकायचा आणि खलिस्तानच्या स्थापनेच्या बढाया मारायचा.

भारत सरकारने त्याला 1 जुलै 2020 रोजी UAPA कायद्यानुसार दहशतवादी घोषित केले आहे. जुलै 2020 मध्ये पंजाब पोलिसांनी अमृतसर आणि कपूरथळा येथे पन्नूविरुद्ध देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले. पन्नू अनेकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खलिस्तानच्या संदर्भात भारताविरुद्ध विष ओकत असे. त्याने आपल्या तथाकथित खलिस्तानमध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडचा समावेश करण्याची धमकीही दिली होती. पन्नूच्या सांगण्यावरून त्याच्या शिख फॉर जस्टिस या संघटनेच्या दहशतवाद्यांनी जगभरातील हिंदू मंदिरे, भारतीय दूतावास आणि नागरिकांना लक्ष्य केलेले आहे.

Khalistani terrorist Pannu died in a car accident in America

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात