विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाला झालेले एकूण मतदान आणि त्यांचे निवडून आलेले एकूण आमदार याच्या आकडेवारी विषयी शरद पवारांना आश्चर्य वाटले, पण लोकसभेतील मतदानाविषयी मात्र त्यांना कोणताही संशय आला नाही.
कोल्हापुरातल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी आपले आश्चर्य बोलून दाखवले. मोठ्या राज्यांमध्ये भाजप सत्तेवर आहे छोट्या राज्यांमध्ये इंडिया आघाडी सत्तेवर आहे. पण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 80 लाख मते मिळाली, पण त्यांचे 16 आमदार निवडून आले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 58 लाख मते मिळाली, पण त्यांचे 41 आमदार निवडून आले ही आकडेवारी पाहून आश्चर्य वाटते. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या लोकांमध्ये उत्साह दिसत नाही असे शरद पवार म्हणाले.
Farmer : शेतकरी नेते म्हणाले- केंद्राने चर्चा करावी, अन्यथा 8 डिसेंबरला दिल्लीत धडकू
पण लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांना मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत फक्त 0.3 % फरक होता महाविकास आघाडीला 0.3 % जास्त मते मिळाली होती, पण महाविकास आघाडीचे 31 खासदार आणि महायुतीचे 17 खासदार निवडून आले होते. मतदानाच्या या आकडेवारी बद्दल आणि टक्केवारी बद्दल शरद पवारांना आश्चर्य वाटले नाही. त्यांनी पत्रकार परिषदेत तसे बोलून दाखवले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App