Sharad Pawar मुलाखतीत पवारांनी शिवसेना फोडण्याचे केले समर्थन; राहुरीत म्हणाले, पक्ष फोडायला अक्कल नाही लागत!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sharad Pawar एकीकडे शरद पवारांनी शिवसेना फोडण्याचे समर्थन केले, तर दुसरीकडे म्हणाले, पक्ष फोडायला अक्कल नाही लागत!! पवारांच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या वक्तव्यांमधून ही राजकीय विसंगती समोर आली. Sharad Pawar

शरद पवारांनीच शिवसेना फोडली. शिवसेना फोडायची माझ्या ताकद नव्हती. 36 जणांनी सह्या केल्या, त्यावेळी सगळ्यात शेवटी मी गेलो. शिवसेना फोडण्याचे “पुण्यकर्म” शरद पवारांचे होते, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला होता. त्या आरोपावर एका युट्युब वरला दिलेल्या मुलाखतीत उत्तर देताना शरद पवारांनी शिवसेना फोडण्याचे समर्थनच केले.

मुलाखतीत शरद पवार म्हणाले :

मी त्यावेळी शिवसेनेत होतो का??, नव्हतो. त्यामुळे माझी जबाबदारी काय होती?? आमच्या विरोधातला जो पक्ष आहे, त्याला शक्ती देण्याचे काम मी करणे अपेक्षित होते का?? उलट त्याला कमकुवत करायचे काम माझे होते, ते मी केले.

आपला पक्ष मजबूत करायचा असेल, तर त्या पक्षाच्या विरोधात असणारे शक्ती कमकुवत करण्यावरच आमचा भर राहणार ना!! त्यामुळे विरोधी संघटनांवरच आम्ही आघात केला. त्यातून आपली शक्ती वाढवायची खबरदारी आम्ही घेतली.


Trump’s : विजयानंतर ट्रम्प यांचा पुतीन यांच्याशी पहिला संवाद, युक्रेनमधील युद्ध न वाढवण्याचे आवाहन


ज्यावेळी आमच्या लक्षात आलं, की छगन भुजबळ आणि त्यांचे काही सहकारी शिवसेनेत अस्वस्थ आहेत आणि ते पक्षातून बाहेर पडू इच्छित आहेत, ते आमच्याशी संपर्क साधणार आहेत, तेव्हा आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला. त्यात आम्ही काही चुकीचे केले नाही. Sharad Pawar

एकीकडे मुलाखतीमध्ये शिवसेना फोडण्याचे असे समर्थन करणारे शरद पवार दुसरीकडे राहुरीच्या प्रचार सभेत मात्र देवेंद्र फडणवीसांवर भडकले. दुसऱ्यांचे पक्ष फोडायला अक्कल लागत नाही स्वतःचा पक्ष उभा करायला अक्कल लागते, असे शरसंधान पवारांनी फडणवीसांवर साधले.

राहुरीच्या प्रचारसभेत शरद पवार म्हणाले :

पक्ष निर्माण करायला अक्कल लागते. पक्ष फोडायला अक्कल लागत नाही. एकनाथ शिंदे यांनी 30 – 40 आमदार गोळा केले आणि ते गुवाहाटीला जाऊन बसले. हेच गृहस्थ उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते.

देवेंद्र फडणवीस यांना विचारले, तुम्ही मोठे काम कोणते केले??, तर ते म्हणाले, मी दुसऱ्याचे पक्ष फोडले. पण पक्ष निर्माण करायला अक्कल लागते. दुसऱ्यांचे पक्ष फोडायला अक्कल लागत नाही.

पवारांनी मुलाखतीत त्यावेळी शिवसेना फोडण्याचे समर्थन केले, आम्ही भुजबळ आणि सहकाऱ्यांची संपर्क साधला. त्यात काही चूक केली नाही, असे म्हणाले. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटले, त्यावेळी मात्र पक्ष फोडायला अक्कल लागत नाही, असे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावले. यातून पवारांची दुटप्पी भूमिकाच महाराष्ट्रासमोर आली.

Sharad Pawar supports shivsena breaking, but opposed NCP breaking

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात