Sharad Pawar : शरद पवार म्हणाले- राज ठाकरेंनी आयुष्यात काहीच केले नाही; अजित पवारांवरही केले भाष्य

Sharad Pawar

विशेष प्रतिनिधी

पुणे : Sharad Pawar राज ठाकरे यांनी उभ्या आयुष्यात काहीच केले नाही. त्यांच्या टिकेला काय उत्तर देणार? अशा शब्दात शरद पवार यांनी टोला लगावला आहे. शरद पवार हे जातीवादी असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दिवाळी पाडव्यानिमित्त पवारांनी कार्यकत्यांची भेट घेत शुभेच्छा स्विकारल्या. या वेळी त्यांनी अजित पवार आणि सरकारवर देखील टीका केली. निवडणुकीच्या काळात सत्ताधारी पक्ष उमेदवारांना रसद पुरवत असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला.Sharad Pawar



दिवाळी पाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी मात्र, राजकारणामुळे 50 वर्षानंतर प्रथमच पवार कुटुंबीयांचे पाडव्याच्या दिवशी दोन स्वतंत्र सोहळे झाले आहेत. यात शरद पवारांचा सोहळा बारामतीत गोविंदबागेत झाला तर पुतण्या अजित पवारांचा सोहळा काटेवाडी या पवार कुटुंबियांच्या मूळ गावी झाला. गेल्या वर्षी अजित पवार, शरद पवारांमध्ये फूट पडली असली तरी दिवाळी पाडवा सोहळा एकत्रित झाला होता.

कार्यकर्त्यांना त्रास झाल्याची खंत

यावर्षी बारामती मध्ये दोन पाडवा कार्यक्रम पार पडले. शरद पवार यांचा एक तर अजित पवार यांचा एक कार्यक्रम झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांना दोन्ही ठिकाणी जावे लागले. कार्यकर्त्यांना झालेल्या या त्रासाची आपल्याला खंत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. मात्र गोविंदबागेत आयोजित पाडव्यासाठी पवार कुटुंबातील सर्वच सदस्य उपस्थित असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. केवळ अजित पवार यांना काही महत्त्वाची कामे असल्यामुळे ते येऊ शकले नसल्याचे पवार म्हणाले.

Sharad Pawar said- Raj Thackeray has done nothing in his life

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात