विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला पण त्याचे नाव ठेवले “शपथनामा”; त्याची खिल्ली उडवत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसिद्ध केला पवारांचा “खंजीरनामा”!! Sharad pawar published his “shapathnama”; BJP targets him as backstabber!!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्रात लोकसभेच्या फक्त 10 जागा लढवत आहे. यासाठी पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध करून त्याचे नामकरण “शपथनामा” असे केले. त्यामध्ये जनतेला भरघोस आश्वासने दिली. देशात जातनिहाय जनगणनेला पाठिंबा दिला. युवक, महिला, शेतकरी यांच्यासाठी काम करण्याची ग्वाही दिली. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देण्यासाठी नवीन आयोग स्थापनेचे आश्वासन दिले. आरक्षणाची मर्यादा 50% च्या वर वाढवण्याची खात्री दिली.
परंतु भाजपने शरद पवारांच्या शपथनाम्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर एक पोस्ट लिहून शरद पवार आणि शपथ या दोन शब्दांचा एकमेकांशी संबंध तरी आहे का??, असा सवाल करून शरद पवार आणि खंजीर या दोन शब्दांचा संबंध आहे, असे दाखवून दिले आहे
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने "शपथनामा" नावाने लोकसभा निववडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जगातील ही सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे. खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? महाराष्ट्रात शपथेला प्राणापेक्षा अधिक महत्व आहे. २६ एप्रिल १६४५ रोजी छत्रपती… — Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) April 25, 2024
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने "शपथनामा" नावाने लोकसभा निववडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
जगातील ही सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे.
खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का?
महाराष्ट्रात शपथेला प्राणापेक्षा अधिक महत्व आहे.
२६ एप्रिल १६४५ रोजी छत्रपती…
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) April 25, 2024
चंद्रशेखर बावनकुळे यांची पोस्ट अशी :
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने “शपथनामा” नावाने लोकसभा निववडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जगातील ही सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे. खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का???
महाराष्ट्रात शपथेला प्राणापेक्षा अधिक महत्व आहे. २६ एप्रिल १६४५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ती पूर्ण केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App