गरवारे क्लब निवडणुकीत शरद पवार पॅनलचा धुव्वा; राष्ट्रवादी फुटीपाठोपाठ संस्थागत राजकारणातही पवारांची मोठी पीछेहाट!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठेच्या गरवारे क्लबच्या निवडणुकीत शरद पवारांच्या पॅनलचा पूर्ण धुव्वा उडाला. अध्यक्षपदी शरद पवारांची बिनविरोध निवड होऊन त्यांची वैयक्तिक प्रतिष्ठा राखली गेली, पण त्यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या डेव्हलपमेंट ग्रुप पॅनलचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही.
Sharad Pawar panel defeated in Garware club elections

त्या उलट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी लक्ष घातलेल्या जीसीएच डायनामिक ग्रुपने सर्व जागांवर विजय मिळविला. पवारांच्या पॅनल मधून उपाध्यक्ष पदासाठी उभे राहिलेल्या भाजप आमदार राज पुरोहित यांना पराभवाचा फटका बसला.

प्रतिष्ठित गरवारे क्लबचा टर्नओव्हर हजारो कोटींचा आहे. त्याच्या निवडणुकीतील मतदानात तब्बल 13000 मतदारांनी सहभाग नोंदवला आणि त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखालच्या पॅनेलचा पूर्ण पराभव केला.

पवारांच्या या पराभवाचे वैशिष्ट्य असे की पवारांनी तीनच महिन्यापूर्वी आपल्या विस्तारित आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात निवृत्ती घोषणा करताना आपण पक्षीय राजकारणातून निवृत्त होऊन संस्थागत राजकारणात लक्ष घालू असे जाहीर केले होते. त्यापैकी पक्षीय राजकारणातून ते बाजूला होऊ शकले नाहीत. उलट त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि बहुसंख्य आमदार त्यांना सोडून गेले.

गरवारे क्लबच्या पराभवामुळे, तर पवारांच्या संस्थागत राजकारणाला देखील सुरुंग लागला आहे. शरद पवार हे बारामतीतल्या आणि मुंबईतल्या अनेक संस्थांचे अध्यक्ष किंवा मोठे पदाधिकारी आहेत. यात मुंबई साहित्य संघासारख्या महत्त्वाच्या साहित्य संस्थेचाही समावेश आहे. पण गरवारे क्लबच्या निवडणुकीत झालेला पराभव हा पवारांच्या संस्थागत राजकारणातल्या पीछेहाटीची सुरुवात असल्याचे मानले जाते.

पवारांना राजकीय निवडणुकीत अद्याप पराभव सहन करावा लागलेला नाही. पण भारतीय क्रिकेट नियमक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जगमोहन दालमिया यांनी पवारांचा पराभव केला होता. त्यानंतर गरवारे क्लबच्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलचा पूर्ण धुव्वा उडून दारुण पराभव झाला आहे. याचा अर्थ पवारांची स्वतःच्या करिष्म्यातून बाकीच्यांना निवडून आणण्याची क्षमता पूर्ण संपुष्टात आल्याचे राजकीय आणि राजकीय बाह्य वर्तुळात बोलले जात आहे.

Sharad Pawar panel defeated in Garware club elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात