विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शरद पवारांच्या उरल्या सुरल्या राष्ट्रवादीत पडले दोन गट; सत्तेच्या वळचणीला जाण्यासाठी दिल्लीत रंगली खलबतं!! असे काल शरद पवारांचा 85 व्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून दिल्लीत घडले.
पवारांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे 85 आमदार निवडून आणण्याचे पवारांच्या परिवाराचे मनोरथ कोसळले. पक्षाचे फक्त 10 आमदार निवडून आले. त्यामुळे त्या आमदारांमध्ये भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाण्यासाठी चलबिचल सुरू झाली. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातले काही पराभूत उमेदवार दिल्लीत होते. त्यांनी एकीकडे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन विरोधात सुप्रीम कोर्टात आवाज उठवायचे ठरविले, पण दुसरीकडे भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाण्यापासून पर्याय नाही हे लक्षात आल्यानंतर पवारांकडे तसा निर्णय घेण्याचा आग्रह धरला.
त्याचबरोबर पवारांच्या राष्ट्रवादीतल्या दुसरा गट अजित पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये विलीन होण्यासाठी उत्सुक झाला. त्याला कारणही तसेच घडले. पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवार हे आपल्या कुटुंबीयांसह आणि बाकीच्या नेत्यांच्या लव्याजम्यासह शरद पवारांच्या घरी गेले. त्यामुळे काका आणि पुतण्या मध्ये दिलजमाई झाल्याचा आनंद राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांमध्ये पसरला. काकांनी पुतण्याशी जुळवून घेतले, तर आपल्यालाही सत्तेच्या वळचणीचा थोडा लाभ मिळू शकेल, अशी आशा आणि अपेक्षा पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली.
त्यातच गौतम अदानींच्या घरी शरद पवारांच्या गटाच्या ज्येष्ठ नेत्याची भाजपच्या बड्या नेत्याशी भेट झाल्याची बातमी आली. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीत सत्तेच्या वळचणीला जाण्यासाठी किती चलबिचल आणि खळबळ सुरू आहे हे समोर आले. मात्र नेहमीप्रमाणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून या बातमीचा इन्कार करण्यात आला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App