राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण आमदार यांची भेट घेताना म्हणे, हात उंचावले आणि मुठी वळवल्या आणि भाजपचे सरकार राज्यात येऊ देत नाही, असे म्हणाले. अशा बातम्या आमदार रोहित पवार यांच्या ट्विट नंतर मराठी माध्यमांमध्ये आल्या आहेत. Sharad Pawar – NCP -Nawab Malik Resign
शरद पवार यांचे निवासस्थान “सिल्वर ओक”मध्ये झालेल्या बैठकीनंतर हे घडले असेल हे खरे. पक्षाच्या तरुण आमदारांनी शरद पवार आणि पुढे काही प्रश्न मांडले त्यावर चर्चा केली आणि हे आमदार तिथून निघत असताना पवारांनी हात उंचावले, मुठी वळवल्या आणि ते म्हणाले घाबरू नका. महाराष्ट्रात भाजपचे सरकार मी येऊ देणार नाही. यामुळे पक्षाच्या तरुण आमदारांमध्ये जोश पसरला. एक आत्मविश्वास आला, असे ट्विट रोहित पवार यांनी केले. त्यावर मराठी माध्यमांनी बातम्या केल्या आहेत.
– मराठी माध्यमांचे नॅरेटिव्ह सेटिंग
अर्थातच मराठी माध्यमांचे हे विशिष्ट नॅरेटिव्ह सेटिंग आहे. ज्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय झाला, त्याकडे दुर्लक्ष व्हावे अशा पद्धतीच्या बातम्या देण्याचा हा प्रकार मानला पाहिजे. भले शरद पवार यांनी तरुण आमदारांमध्ये जोश भरण्यासाठी हात उंचावून मुठी आवळल्या असतील, भाजपचे राज्य महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असे म्हणाले असतील… पण पवार यांची प्रत्यक्षात कालची राजकीय कृती कोणती होती…??… तर ती नवाब मलिक यांचे राजकीय पंख छाटण्याची होती ना…!! नवाब मलिक यांचे अधिकार काढून देण्याची होती ना…!! नवाब मलिक यांची मंत्रिपदाची खाती काढून घेऊन ती इतरांना देणे आणि नवाब मालिक यांना बिनखात्याचे मंत्री ठेवणे हीच राजकीय कृती होती ना…!!
– माघारीचा अर्थ पोहोचलाच!!
मग ही बातमी लपवणे शक्य नव्हते. तेव्हा ती “सॉफ्ट” करून द्यायची असा प्रयत्न मराठी माध्यमांनी केला. तरी प्रत्यक्षातला त्याचा राजकीय अर्थ पोहोचल्याशिवाय राहायला नाही. तो राजकीय अर्थ हाच आहे की नवाब मलिक हे आता बिनखात्याचे अर्थात बिन राजकीय अर्थाचे मंत्री उरले आहेत. त्यांच्याकडे आता ना अधिकार… ना पालकमंत्रीपद… अल्पसंख्यांक मंत्रीपद…!!
– स्वनिर्मित जोखडातून सुटकेचा प्रयत्न
त्यामुळे नवाब मालिकांचा राजीनामा घेण्याच्या स्वनिर्मित जोखडातून पवारांनी चतुराईने सुटका करून घेतली आहे. पण हे करताना आपण माघार घेतली किंवा आपल्याला माघार घ्यावी लागली हे कबूल करायचे कसे…?? म्हणून हात उंचावावे लागले. मुठी वळवाव्या लागल्या आणि भाजपचे राज्य महाराष्ट्रात येऊन देणार नाही असे म्हणावे लागेल…!! हे कितीही अमान्य केले तरी कटू वास्तव आहे…!!
– सॉफ्ट स्टोरीजची पेरणी
मग भले मराठी माध्यमांनी पवारांच्या राजकीय वक्तव्याला आणि कृतीला “पॉवरफुल खेळी”चे कितीही मुलामे देवोत की कितीही सॉफ्ट स्टोरीज पेरोत…!! नवाब मलिक प्रकरणात पवारांच्या माघारीचे आणि राष्ट्रवादीचे मंत्री केंद्रीय तपास संस्थांच्या कायदेशीर कचाट्यात अडकल्याचे राजकीय वास्तव यातून लपून राहात नाही…!!
– बोलातून भरलेला जोश
शरद पवारांच्या उंचावलेल्या हातातून आणि वळलेल्या मुठीतून पक्षाच्या 5 -10 तरुण आमदारांमध्ये जोश भरला असेल, पण पवारांची कालची प्रत्यक्षात राजकीय कृती मात्र स्वनिर्मित राणा भीमदेवी थाटाच्या जोखडातून सुटका मिळवण्यासाठी होती हे हे वास्तव नाकारून चालणार नाही किंबहुना नवाब मलिक यांचे पंख छाटले या बातमी वरूनच ते ठळकपणे स्पष्ट होते आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App