प्रतिनिधी
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेची तुलना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेशी केली आहे.Sharad Pawar – Nawab Malik with narayanb rane comparison
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉड्रिंग केल्याबद्दल नवाब मलिक यांना अटक झाली आहे, तर नारायण राणे यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह उद्गार काढल्याबद्दल अटक झाली होती.
मात्र, या मुद्द्यावर पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, की नवाब मलिक यांना अटक झाली म्हणून मंत्रिमंडळातून काढा, अशी मागणी केली जात आहे. मलिक यांना अटक झाली हे खरे. परंतु सिंधुदुर्गातील आमचे जुने सहकारी नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यांना अटक झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे पाहण्यात आले नाही. उद्या पंतप्रधान पुण्यात येत आहेत. कदाचित याचा खुलासा ते करतील. एक न्याय नारायण राणे यांना लावता आणि दुसरा न्याय नवाब मलिक यांना लावता याचा अर्थ हे सगळे राजकीय हेतूने केले जात आहे.
एखादा मुस्लिम कार्यकर्ता दिसला की त्याला दाऊदचा जोडीदार बोलायचे. कारण नसताना हे आरोप केले जात आहेत. कधीकाळी माझ्यावरही असेच आरोप झाले होते. हे लोक या पद्धतीने वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात. त्याची चिंता करण्याचे कारण नाही, असे पवार म्हणाले.
नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने व राजकीय हेतूने कारवाई केली गेली आहे. त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना यातना देण्याचा प्रयत्न जाणूनबुजून केला जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App