विशेष प्रतिनिधी
ठाणे : वय झाल्यानंतर थांबायचं असतं. ही परंपरा आपल्याकडे आहे. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. हट्टीपणा करतात. वय झालं चौऱ्यांशी, तरी थांबायची नाही तयारी!!, अशी काहींची अवस्था आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांची खिल्ली उडवली. sharad Pawar mocked again by Ajit Dada
सरकारी नोकरीत तर 58 लाच रिटायर होतात. काही 65 ला, तर काही जण 70 ला रिटायर होतात. पण, काही मात्र 80 झाले, 84 झाले तरी थांबेना. अरे काय चाललंय?. आम्ही आहोत मागे निर्णय घ्यायला,’ अशा शब्दांत अजितदादांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. कल्याण येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अजित पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले, तर दुसरीकडे शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्या वयाचा उल्लेख करत राजकारणातून निवृत्त होण्याचा सल्ला दिला.
कायदा हातात घेऊ नका, मनोज जरांगेंना इशारा
अजित पवार पुढे म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दुमत कुणाचंच नाही. परंतु, काही जण आता टोकाचं बोलताहेत. मुंबईत येण्याची भाषा करत आहेत. जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही. धनगर समाज आरक्षण मागतोय. आदिवासी म्हणतात आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका. जे मागास आहेत त्यांना इतरांच्या बरोबरीने आपल्याला आणायचे आहे, असे अजित पवार म्हणाले.
मोदींसारखे दुसरे नेतृत्व नाही
ग्रामीण भागात कचऱ्याची समस्या मोठी आहे. रस्त्यांचीही समस्या आहे. कचरा विल्हेवाट लावण्याची ताकद गावांमध्ये नाही. यासाठी राज्य आणि केंद्राची साथ लागते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत अनेकवेळा होता. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत गेलं पाहिजे. आज पंतप्रधान मोदींसारखं दुसरे नेतृत्व नाही. मागील नऊ वर्षांत त्यांनी मोठे काम केले. वाहतुकीला गती देण्याचे काम केले. चांद्रयानाचे सगळ्यांनी कौतुक केले. 80 कोटी लोकांना मोफत धान्य सरकार देत आहेत. घरे देण्याचे काम सरकार करत आहे. शेतकऱ्यांना सहा हजार आणि आम्ही सहा हजारांची भर टाकली. 12 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमची विचारधारा वेगळी होती तरी महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोना होता. त्यावेळीही मी सकाळी 8.00 वाजताच मंत्रालयात जाऊन बसायचो. काही जण म्हणायचे कोरोना आहे. मी म्हणायचो मेलो तरी चालेल पण लोकांचे प्रश्न सुटायला पाहिजेत. त्यामुळे आता कोण काय चर्चा करतोय याला जास्त महत्व देत नाही. विकासाला महत्व देतो, असे अजित पवार म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App