प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी शरद पवारांची चर्चा झाली होती. कोणाला कोणते मंत्री पद द्यायचे हे देखील ठरले होते. पण पवारांनीच शब्द फिरवला, असा आरोप राज्याचे माजी मंत्री भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केला आहे.Sharad Pawar is telling half truth, he is the one who twisted the word; Allegation of Girish Mahajan
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल एका मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला महाराष्ट्रात भाजपबरोबर सरकार स्थापन करण्याची ऑफर दिली होती पण मी ती नाकारली, असा दावा केला होता. त्यावरून अनेक राजकीय नेत्यांनी आता प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याचबरोबर “पाठीत खंजीर खुपसणे” या संदर्भातली आठवणी सांगितली आहे.
भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गिरीश महाजन म्हणाले, की शरद पवार अर्धसत्य सांगत आहेत. भाजपच्या नेत्यांची शरद पवारांची सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली होती. कोणाला कोणते मंत्री पद द्यायचे होते हेही ठरले होते. परंतु शिवसेनेसमवेत काँग्रेस यायला तयार झाली. त्यामुळे शरद पवारांनी भाजपला दिलेला आपला शब्द फिरवला, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे. गिरीश महाजन यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे नेते नेमके काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App