विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवार हे राजकारणातील शकुनीमामा असल्याची टीका रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील राजकारणातील कर्ण तर देवेंद्र फडणवीस हे अर्जुन असल्याचेही ते म्हणाले. Sharad Pawar is Shakunimama In politics criticisam of Sadabhau Khot
मुंबईत पत्रकारांशी बोलताना खोत म्हणाले, मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण मिळवून दिले होते. मात्र हे आरक्षण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी घालवले .राज्यात एकनाथ शिंदे नावाच्या वाघाने बंड केले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने महाविकास आघाडीचे सरकार पाडून पुन्हा महायुतीचे सरकार आणले.
Kolkata rape : मृत्यूपूर्वी पीडितेला दिल्या जखमा, बलात्काराची पुष्टी, पण फ्रॅक्चर नाही; कोलकाता घटनेचा तपशीलवार पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर
राज्य कसे चालवायचे याची दूरदृष्टी देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. मात्र, सध्या देवेंद्र फडणवीस यांना सर्वांनी घेरले आहे. कारण तेच आपल्याला फाईट देऊ शकतात हे शरद पवार यांना माहित आहे. त्यामुळे या शकुनी मामाने वेगवेगळी आंदोलने आतापर्यंत राज्यात उभी केली.
आतापर्यंत राज्यात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले आहेत. मात्र एकाही मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. 2019 मध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात पहिल्यांदी केले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला मिळालेले हे आरक्षण घालवले. मात्र या दोघांवर टीका होत नाही तर ती टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर होते. प्रस्थापितांना धक्का देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळेच त्यांच्यावर टीका होत असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App