शरद पवारांना बोलताना कफाचा त्रास; पुढच्या 4 दिवसांचे सगळे कार्यक्रम रद्द!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवारांना कफ झाल्यामुळे बोलताना त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे पुढच्या 4 दिवसांमधले त्यांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) अधिकृत ट्विटर हँडलच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.

शरद पवारांची कालच कोल्हापूर मध्ये पत्रकार परिषद झाली होती. त्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात देखील पवारांचे भाषण झाले होते. त्यावेळी घशाचा त्रास झाल्याचे जाणवत होते. तशा बातम्याही मराठी माध्यमांनी चालवल्या होत्या. घशाचा त्रास होत असतानाही पवारांनी जोरात भाषण केले असे त्या बातम्यांमध्ये माध्यमांनी नमूद केले होते.

परंतु, आज कफाचा त्रास वाढल्याने पवारांचा हिंगोली जिल्ह्याचा दौरा रद्द झाल्याची बातमी आली. त्यापाठोपाठ पुढच्या 4 दिवसांचे कार्यक्रम शरद पवारांनी रद्द केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) अधिकृत ट्विटर हँडलवर या संदर्भात माहिती देण्यात आली. त्याचाच हवाला देऊन एएनआय या वृत्त संस्थेने पवारांचे कार्यक्रम रद्द झाल्याची बातमी दिली.

Sharad Pawar is having difficulty speaking due to cough.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात