विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात इमोशनल कार्ड खेळताना शरद पवारांनी तिथे निवृत्तीचे संकेत दिले होते, पण तीनच दिवसानंतर धाराशिव जिल्ह्यामधल्या परांड्यात मी काय म्हातारा झालो का??, असा सवाल करून त्यांनी निवृत्तीचे संकेत मागे घेतले.
बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये युगेंद्र पवार यांच्या प्रचार सभेत बोलताना शरद पवारांनी निवृत्तीचे संकेत दिले होते त्यावेळी त्यांनी तिथे नेहमीचच भाषण केले. आम्ही 14 निवडणुका लढलो एकाही निवडणुकीमध्ये हरलो नाही बारामतीकरांनी मला घरी पाठवून विश्रांती घेऊ दिली नाही. माझ्याबरोबरच कायमच अजित पवारांना संधी दिली. सुप्रिया सुळेंना संधी दिली. पण आता कुठेतरी थांबले पाहिजे. राज्यसभेत माझी दीड वर्षांची मुदत शिल्लक आहे. त्यानंतर तिथे जायचे की नाही हे ठरवावे लागेल, पण निवडणूक मात्र मी कोणतीच लढणार नाही. फक्त नव्या पिढीला तयार करायचे काम करणार म्हणून तुम्ही योगेंद्र पवारांना संधी द्या, असे शरद पवार म्हणाले होते.
पण धाराशिव मधल्या परांड्यात बोलताना शरद पवारांनी आपण म्हातारे झालो नसल्याचा निर्वाळा दिला. शरद पवार या वयात देखील फिरत आहेत. याचा उल्लेख खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले ओमराजे जे बोलले ती गोष्ट मला अजिबात पटली नाही. तुम्ही म्हणालात या वयात देखील मी फिरतो पण मी काय म्हातारा झालोय का??, हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही. स्वस्थ बसणार नाही!!
परंडा मतदारसंघात आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोठे यांच्यात सामना होतो आहे. तिथे दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली होती. आज शरद पवारांनी सहभागी घेतली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App