मृत आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
विशेष प्रतिनिधी
बलुचिस्तान : Pakistan Railway Station पाकिस्तानमध्ये स्फोट झाला आहे. वायव्य बलुचिस्तानमध्ये हा स्फोट झाला. क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात सुमारे 21 जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात 30 जण जखमी झाले आहेत.Pakistan Railway Station
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानकाच्या बुकिंगच्या काळात हा स्फोट झाला. ट्रेन थोड्याच वेळात फलाटावर पोहोचणार होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक स्फोटाच्या प्रभावाखाली आले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्टेशन सील केले आहे. जखमींना क्वेट्टा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी अतिरिक्त डॉक्टर आणि पॅरामेडिक्सला पाचारण करण्यात आले आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, वेळेनुसार जाफर एक्स्प्रेस सकाळी नऊ वाजता स्थानकावर येणार होती. जाफर एक्सप्रेस पेशावरला जाते. मृत आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
क्वेट्टाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मुहम्मद बलोच यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी हा आत्मघाती हल्ला असल्याचे दिसते. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. ते म्हणाले की, दहशतवादी हे मानवतेचे शत्रू आहेत. त्यांनी निरपराध लोकांना लक्ष्य केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App