यशवंतराव नेहमी कुंपणावर; पवारांचे पाय दोन डगरींवर!!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांनी बंडखोरी करून पक्षातले बहुसंख्य आमदार आपल्या दिशेने खेचून नेल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या भूमिकेवर ठळक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शरद पवारांनी अजित पवारांच्या बंडाला पत्रकार परिषदेत विरोध करून खरी राष्ट्रवादी आपल्याबरोबरच असल्याचा दावा केला असला, तरी शरद पवारांच्या भूमिकेविषयी राष्ट्रवादीच्याच नव्हे, तर बाकी सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांमध्ये दाट संशय आहे. Sharad pawar habitual double gamer like his political guru y. b. Chavan

कारण पवारांची भूमिका नेहमीच दोन डगरींवर पाय ठेवण्याची राहिली आहे. एकाच वेळी पवार मोदींशी वैयक्तिक संधान साधून राहतात, तर दुसरीकडे हेच पवार विरोधी ऐकण्यासाठी प्रयत्न करतात, ही बाब फारशी अनाकलनीय नाही!!

 यशवंतरावांचा दुटप्पी वारसा

उलट तो त्यांच्या राजकीय गुरूंचा वारसास त्यांच्याकडे आला आहे. शरद पवारांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांच्या देशातल्या राजकारणाचे वर्णन त्यावेळचे अनेक पत्रकार यशवंतराव नेहमी कुंपणावर बसतात, असे करीत असत. यशवंतरावांनी कधीच केंद्रीय राजकारणामध्ये ठाम भूमिका घेतली नाही. पंडित जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या विरोधात ठाम उमेदवार घेणे यशवंतरावांना शक्य नव्हते. कारण हे दोन्ही नेते यशवंतरावांना सीनियर होते. पण इंदिरा गांधी यांच्या विरोधात यशवंतरावांना खऱ्या अर्थाने कधीच ठाम भूमिका घेता आली नाही, तसेच यशवंतराव मनापासून त्यांच्या बाजूने उभे देखील राहू शकले नाहीत. अगदी 1969 मध्ये सिंडिकेट – इंडिकेट काँग्रेसच्या वेळेपासून ते 1980 मध्ये इंदिरा गांधींना प्रचंड बहुमत मिळून त्या पुन्हा सत्तेवर आल्यानंतर यशवंतरावांची राजकीय फरफट झाली. सिंडिकेट – इंडिकेट काँग्रेसच्या वेळी यशवंतरावांनी सुरुवातीला मोरारजी, कामराज, स. का. पाटील यांना पाठिंबा दिला. पण इंदिरा गांधी आपल्याला मंत्रीपदावरून हटवू शकतात ही भीती वाटताच यशवंतरावांनी सिंडिकेट सोडून इंडिकेटला पाठिंबा दिला. त्यावेळी त्यांनी सिंडिकेटच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देणे ही आपली चूक होती, असे मुंबईत काँग्रेसच्या मेळाव्यात जाहीर कबूल केले होते. यशवंतरावांच्या या पडखाऊ भूमिकेमुळे त्यांचे मंत्रीपद वाचले.
यशवंतराव आणीबाणीमध्येही मुकाटपणे केंद्रीय मंत्रीपद सांभाळून राहिले.



दोलायमान यशवंतराव

1977 मध्ये इंदिरा गांधी पराभूत झाल्यानंतर देखील यशवंतरावांना ठाम भूमिका घेतली नव्हती. मोरारजींचे सरकार पडल्यानंतर विरोधी पक्ष नेते म्हणून यशवंतराव चव्हाण यांना त्यावेळचे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी सरकार स्थापनेची संधी दिली होती. पण यशवंतरावांनी आयत्या वेळी कच खाल्ली आणि सरकार बनवायला नकार दिला आणि ते चरण सिंग यांच्या मंत्रिमंडळात उपपंतप्रधान झाले. त्यावेळी यशवंतरावंनी इंदिरा गांधींपासून दूर जात ब्रह्मानंद रेड्डी यांच्यासमवेत चव्हाण – रेड्डी काँग्रेस काढली होती, याची साक्ष खुद्द शरद पवारांनी आपल्या “लोक माझे सांगाती” या आत्मचरित्र दिली आहे.

1980 मध्ये चरण सिंग सरकार गडगडले. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत इंदिरा गांधींना प्रचंड बहुमत मिळाले चव्हाण – रेड्डी काँग्रेसचा सुपडा साफ झाला. त्यावेळी यशवंतरावांना सत्तेबाहेर राहणे कठीण झाले आणि म्हणूनच यशवंतराव इंदिरा गांधींशी तडजोड करून दिल्लीपुढे शरणागत होत काँग्रेसवासी झाले. त्यानंतर यशवंतराव राजकारणातून हळूहळू अस्तंगत होत गेले. पण यशवंतरावांना ते नेहमी कुंपणावर बसत असल्याबद्दल त्यांच्या समर्थकांनी अनेकदा दोष दिला.

पवारांचे नेहमीच दोन डगरींवर पाय

जे यशवंतरावांचे तेच पवारांचे…!! पवारांनी सुरुवातीला आपले राजकारण काँग्रेस विरोधी ठेवले तरी त्यांना त्या भूमिकेत स्थिरता राखता आली नाही. सत्तेशी कायम जवळीक ठेवण्यासाठी पवार दोन डगरींवर पार ठेवत राहिले. काँग्रेस मधून निवडून आलेले पवार यशवंतराव वसंतदादांच्या सरकार मधून बाहेर पडून पुलोद बरोबर जाऊन सरकार स्थापन कर्ते झाले. त्यामुळेच त्यांच्यावर वसंतदादांच्या पाठीत खंजीर खूप असल्याचा ठपका आजतागायत कायम राहिला. इंदिरा गांधींनी 1980 मध्ये त्यांचे सरकार बरखास्त करत त्यांना विरोधी पक्षात पाठवले. पण पवारांना सत्तेबाहेरचे राजकारण फारसे मानवले नाही. 1986 मध्ये त्यांनी राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्येच प्रवेश केला. पवारांचे आणि काँग्रेसचे नाते “लव्ह हेट रिलेशनशिप” सारखेच राहिले. 1999 मध्ये सोनिया गांधी विरोधात परकीयत्वाचा मुद्दा काढलेले पवार दोन महिन्यात त्यांच्याच काँग्रेसबरोबर जाऊन बरोबर जाऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन कर्ते झाले होते.

2014 नंतर पवारांची मोदींशी पॉलिटिकल केमिस्ट्री निश्चित जमली, पण त्याची राजकीय ॲक्शन फलद्रूप होऊ शकली नव्हती. आता देखील ती राजकीय ॲक्शन अजित पवारांनी फलद्रूप करून दाखवली, तेव्हाही पवारांची भूमिकाही संशयास्पद आहे. पवार भले आपला अजितदादांच्या बंडाला पाठिंबा नाही. आपण नवीन पक्ष उभा करू, असे म्हणत असतील, तरी 6 जुलैच्या बैठकीत पवार बहुसंख्य आमदारांच्या बाजूने कौल देणारच नाहीत, याची कोणालाही खात्री देता येणार नाही. किंबहुना आमच्या पक्षात लोकशाही आहे त्यामुळे आमदारांच्या बहुमताचा निर्णय मी मान्य करतो, असे पवार म्हणण्याची दाट शक्यता आहे.

पवारांच्या संशयास्पद भूमिकेने सबुरीची वेळ

एकीकडे पवार विरोधकांची मोट बांधायच्या मागे लागले आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे राजकीय भांडवलीकरण थांबल्याने सगळेच आमदार अस्वस्थ आहेत. राष्ट्रवादी आणि सत्ता हे समीकरण जुळत नसले तर राष्ट्रवादीच्या अस्तित्वाला राजकीय अर्थ उरत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे पवार दोन डगरींवर पाय ठेवून आहेत. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर ज्या पद्धतीने शिवसेनेत तीव्र प्रतिक्रिया उमटली होती, तेवढी तीव्र प्रतिक्रिया अजित पवारांच्या आजच्या शपथविधीमुळे राष्ट्रवादीत उमटली नाही. उलट पवारांच्या संशयास्पद भूमिकेमुळे सबुरीने घेण्याची वेळ पवारनिष्ठांवर आली आहे. कारण शरद पवारांचे राजकारण हे नेहमीच दोन डगरींवर पाय ठेवणारे राहिले आहे!!

Sharad pawar habitual double gamer like his political guru y. b. Chavan

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात