‘’अजित पवारांचे विचार वेगळे आणि आमचे वेगळे, जे काही घडले ते…’’ सुप्रिया सुळेंचं माध्यमांसमोर विधान!


‘’शरद पवार यांनी सर्वांना कुटुंबाप्रमाणे वागणूक दिली आणि ते…’’ असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  महाराष्ट्राच्या राजकारणात काल महाभूकंप घडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे ३० पेक्षा अधिक आमदारांना घेऊन  शिंदे-फडणवीस  सरकरामध्ये सामील झाले. एवढच नाही तर त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ आमदरांनीही  मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारपरिषद घेत, प्रतिक्रिया देत भूमिका स्पष्ट केली. Supriya Sule’s reaction on Ajit Pawars rebellion

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘’जे काही घडले ते वेदनादायक आहे. शरद पवार यांनी सर्वांना कुटुंबाप्रमाणे वागणूक दिली आणि ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या वक्तव्यानंतर बोलणे योग्य ठरेल, असे मला वाटत नाही. त्याची प्रतिक्रिया होती की आपण एका लोकशाही देशात राहत आहोत जिथे प्रत्येकाला स्वतःसाठी बोलण्याचा आणि आपले मुद्दे ठेवण्याचा अधिकार आहे. अजित पवारांची वाटचाल हा त्यांचा स्वतःचा निर्णय आणि दृष्टिकोन आहे. अजित पवार यांच्याशी माझे नाते बदलणार नाही, ते नेहमीच माझे मोठे भाऊ राहतील. आम्ही पक्षाची पुनर्बांधणी करू.’’

याचबरोबर, ‘’विचार आणि द्वेष या वेगळ्या गोष्टी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कधीही द्वेष किंवा गैरसमज नव्हता, अजित पवारांचे विचार वेगळे आणि आमचे वेगळे. आम्ही आमच्या सर्व आमदारांचा आदर करतो. मी नेहमी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी आणि नेत्यांशी बोलते, कालही त्यांच्याशी बोलले आणि उद्याही त्यांच्याशी (पक्षाचे नेते आणि सदस्य) बोलेन.’’ असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

राष्ट्रीय तपास यंत्रणांवर टीका-

‘’आम्ही त्यांना ICE (आयकर, CBI आणि ED) म्हणतो. बहुतेक वेळा ते (राष्ट्रीय संस्था) विरोधी नेत्यांची चौकशी करतात. तिथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मी कधीच दोष देत नाही पण ते दुसऱ्या बाजूने घडत होते, मी या गोष्टींना ICE म्हणतो.’’ अशा शब्दांमध्ये सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणांवर टीका केली.

याशिवाय, ‘’भाजप 24×7 निवडणुकीच्या मूडमध्ये आहे… राष्ट्रवादीला भ्रष्ट पक्ष म्हणणारा भाजप आता आमच्या नेत्यांचे स्वागत करत आहे. कसे? भाजपचे उमेदवार कोण असतील यावर मी भाष्य करू इच्छित नाही. इतरांच्या आयुष्यात डोकावण्यापेक्षा मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करेन…मी सदैव राष्ट्रवादी आणि सत्यासोबत आहे, अशा प्रकारच्या आव्हानांना मी दररोज सामोरे जात आहे. हे (अजित पवारांचे बंड) माझ्यासाठी नवीन आव्हान आहे.’’ असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपावर निशाणा साधला.

Supriya Sules reaction on Ajit Pawars rebellion

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात